Koyna Water Issue : कोयनेतून पाण्याची अडवणूक करणाऱ्यांना जिल्ह्यात फिरकू देणार नाही

Vishwajeet Kadam : दुष्काळी भागातील शेतकरी पाण्यासाठी टाहो फोडतोय. याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. पाणी अडवण्याचे पाप करू नका.
Koyna Water Issue
Koyna Water Issue Agrowon

Sangli News : दुष्काळी भागातील शेतकरी पाण्यासाठी टाहो फोडतोय. याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. पाणी अडवण्याचे पाप करू नका. सांगली जिल्ह्याच्या हक्काचे पाणी कोयनेतून सोडण्यासाठी साताऱ्यातून राजकारण केले जात आहे. या नेत्यांना जिल्ह्यात फिरकू देणार नाही, असा माजी कृषी राज्यमंत्री आमदार विश्वजित कदम यांनी दिला.

सांगली येथे सोमवारी (ता. ११) जिल्ह्यातील दुष्काळी प्रश्नाबाबत विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून सकाळी अकरा वाजता आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा सुरू झाला.

या मोर्चात जतचे आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, महेंद्र लाड, जयश्री पाटील, जितेश कदम यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी, कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. ‘पाणी आमच्या हक्काचे...’ अशा सरकार विरोधात घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला.

Koyna Water Issue
Koyna Water Issue : कोयनेच्या हक्काच्या पाण्याचा वाद मिटणार का?

आमदार विश्वजित कदम म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यासह इतर तालुक्यातही पाणीटंचाई भासू लागली आहे. चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. शेतकरी दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. स्व. वसंतदादा पाटील, स्व. पतंगराव कदम, स्व. आर. आर. पाटील यांनी दुष्काळात कधीच पक्षपात केला नाही.

मात्र, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणी द्यावे, अशी भूमिका सरकारची दिसत नाही. सरकार पक्ष फोडाफोडीचे राजकारणात गुंतला आहे. ग्रामीण भागातील प्रश्न, पाण्याचे प्रश्न, शेतीचे प्रश्नाचे कोणालाही पडले नाही.

सांगली जिल्ह्याला कोयनेचे हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, यासाठी अधिकारी, प्रशासन यांच्यात बैठका घेतल्या. पण त्यावर मार्ग काढण्याऐवजी पाणी कसे अडवले जाईल, याकडे सातारचे नेते लक्ष घालत आहेत. सांगलीच्या हक्काचे पाणी अडवले तर तुम्हाला सांगली जिल्ह्यात फिरकू देणार नाही. आपल्याला हुकूमशाहीच्या विरोधात लढायचे आहे. हक्काचे पाणी मिळवण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवा.’’

Koyna Water Issue
Koyna Water Dispute : कोयनेतील पाण्याचा वाद पेटणार

आमदार विक्रम सावंत म्हणाले, ‘‘सन २०११ च्या जनगणना लक्षात घेऊन ट्रॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाणी कमी पडत आहे. जनावरांच्या पाण्याचे नियोजनच केले नाही. त्यामुळे पिण्यासाठी वाढीव टॅंकर, जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याचे व्यवस्था झालीच पाहिजे.’’

विशाल पाटील म्हणाले, ‘‘पाण्याचे राजकारण करण्याचे कोणालाही गरज नाही. परंतु भाजपचे पालकमंत्री, खासदार, आमदार, फक्त पाण्यासाठी राजकारण करत आहेत. पाणी हवे तर, पालकमंत्री, खासदारांना भेटल्याशिवाय मिळणार नाही, अशी भूमिका संबंधित विभागाने घेतली आहे. पैसे भरा, मग पाणी सोडतो, पैसे भरले तरी, महिना महिना पाणी मिळत नाही.’’ यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना याबाबतचे निवेदन दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com