Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam : उजनी धरणात ६७ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

Ujani Dam Water Level :सोलापुर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणाच्या वरच्या बाजूकडील धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू झाल्याने या धरणातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग उजनी धरणाकडे सोडण्यात येत आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापुर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणाच्या वरच्या बाजूकडील धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू झाल्याने या धरणातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग उजनी धरणाकडे सोडण्यात येत आहे.

गुरुवारी (ता. २५) पहाटे ४३ हजार क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. तर दुपारी ६७ हजार क्युसेकपर्यंत तो वाढवण्यात आला. त्यामुळे धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत असून, उणे पातळीमध्ये गेलेले धरण येत्या दोन दिवसांत अधिकपातळीत येण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. विशेषतः धरणक्षेत्रात पावसाचा वेग मोठा आहे. उजनी धरणाच्या वरच्या बाजूला जवळपास छोटी-मोठी १८ धरणे आहेत.

या धरणात पाण्याची पातळी बऱ्यापैकी वाढली आहे. त्यामुळे हे पाणी आता पुढे उजनीकडे सोडण्यात येत आहे.

गुरुवारी (ता. १८) बंडगार्डन, लोणावळा, भीमाशंकर आदी परिसरातील धरणांतून साधारण ६७ हजार क्युसेकचा विसर्ग एकत्रित दौंडमधून उजनीकडे येत होता. उजनी धरण सध्या उणे १२ टक्क्यांवर आहे. पाण्याचा हा विसर्ग असाच राहिला किंवा आणखी वाढवल्यास येत्या दोन दिवसांत धरण उणेतून अधिक पातळीत येण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT