Water Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik Heavy Rainfall: नाशिक जिल्ह्यात चार धरणांतून विसर्ग

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे गंगापूर, दारणा, कडवा आणि पालखेड या चार धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच धरणे भरू लागल्याने पूरस्थितीची शक्यता वाढली आहे.

Team Agrowon

Nashik News: नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (ता. १९) पश्चिम पट्ट्यात इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली. धरणात पाणीसाठा वाढल्याने गंगापूर, दारणा, कडवा व पालखेड या चार धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने दारणातून सर्वाधिक ४,७४२ क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे.

शुक्रवारी (ता.२०) सकाळी १० वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १० दहा महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामध्ये इगतपुरी तालुक्यातील धारगाव महसूल मंडलात सर्वाधिक १७२ मिमी पावसाची नोंद झाली. यांसह इगतपुरी, घोटी, वाडीवऱ्हे, नांदगाव या महसूल मंडलांत अतिवृष्टी, तर टाकेद महसूल मंडलात मुसळधार पाऊस झाला.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील त्र्यंबकेश्वर वेळुंजे, हरसूल व ठाणापाडा या चारही महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यांसह पेठ तालुक्यात अतिवृष्टी तर जोगमोडी, कोहर व करंजाळी या महसूल मंडलांमध्ये मुसळधार पाऊस झाला.

जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम २४ धरण प्रकल्पांत मागील सप्ताहात पाणीसाठा २५ टक्क्यांवर होता. तो आता ३५ टक्क्यांवर आला. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर असल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तर गोदावरी नदीपात्रात पाणीपातळी वाढून नाशिक शहरातील पंचवटी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती.

यंदा एक महिना आधी विसर्ग सुरू

मागील वर्षी पावसाचा जोर जुलै महिन्यात वाढला होता. परिणामी दारणा व कडवा या धरणांतून जुलैअखेर विसर्ग सुरू करण्यात आला होता. तर पालखेड व गंगापूर या धरणांतून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या सप्ताहात विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र यंदा जून महिन्याच्या तिसऱ्या सप्ताहातच पावसाचा जोर वाढल्याने दारणा, कडवा, गंगापूर व पालखेड या धरणांतून गुरुवारपासून (ता.१९) विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

या धरणांतून विसर्ग सुरू (ता.२० रोजी दुपारी २ वाजता)

धरण विसर्ग (क्युसेक)

दारणा ४७४२

गंगापूर ११६०

कडवा ५३०

पालखेड ३०४०

नांदूरमधमेश्वर १५,७७५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sustainable Agriculture Day: डॉ. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस शाश्‍वत शेती दिन

Sugar Production: देशात जुलैअखेर साखरेचे २५८ लाख टन उत्पादन

Agriculture Department: 'कृषी’तील बदल्यांचा सावळागोंधळ सुरू

Maharashtra Rain Update: विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

Anti Corruption: विहिरीच्या नोंदीसाठी लाच मागणारा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात 

SCROLL FOR NEXT