Pune Heavy Rain: आंबेगावमध्ये सर्वाधिक १९४ मिमी पाऊस

Pune Monsoon Update: गेले दोन दिवस पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुन्हा पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. बुधवारी (ता. १८) रात्रीपासून पावसास सुरुवात झाल्यानंतर गुरुवारी (ता. १९) दिवसभर पावसाची संततधार सुरू होती.
Ambegaon Rain fall
Ambegaon Rain fallAgrowon
Published on
Updated on

Pune News: गेले दोन दिवस पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुन्हा पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. बुधवारी (ता. १८) रात्रीपासून पावसास सुरुवात झाल्यानंतर गुरुवारी (ता. १९) दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. गुरुवारी सकाळी आठपर्यंत शहरातील आंबेगाव येथे सर्वाधिक १९४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

पावसामुळे खडकवासला धरणासह अनेक तलावातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.जिल्ह्यातील जाधववाडी तलाव ९४.५३ टक्के भरलेला आहे. सद्यःस्थितीचा पाऊस व धरणातील येवा वाढल्यामुळे सुधा नदी (इंद्रायणी नदी) पात्रात कोणत्याही क्षणी जाधववाडी लघू पाटबंधारे भरून अनियंत्रित विसर्ग चालू होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे जांबवडे, सुदुंबरे, सुदवडी, देहू-आळंदी ते तुळापूरपर्यंतच्या सर्व नदीकाठच्या गावांना नदीपात्रालगत जाऊ नये, नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावीत, विशेषतः पायी दिंडी सोहळ्याच्या अनुषंगाने देहू-आळंदी येथे आलेल्या भाविक वारकरी यांना नदीपात्रामध्ये न जाण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

Ambegaon Rain fall
Monsoon Rain: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

तसेच संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका व महापालिका यांना इंद्रायणी नदी अनियंत्रित विसर्गाबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. खडकवासला धरण रोजी धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे गुरुवारी दुपारी एक वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये १९२० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

मळवंडी ठुले लघू पाटबंधारे तलाव शंभर टक्के भरलेला आहे. सद्यःस्थितीचा पाऊस व धरणातील येवा वाढल्यामुळे कोथुर्णे ओढा (पवना नदी) मध्ये मळवंडी तलाव भरून अनियंत्रित विसर्ग चालू झालेला आहे. वारू, कोथुर्णे, ब्राह्मनोली, काले पर्यंतच्या सर्व ओढाकाठच्या गावांना ओढ्यालगत जाऊ नये.

Ambegaon Rain fall
Rain Update: राज्यातील अनेक भागात पावसाची हजेरी

आडले तलाव शंभर इतका भरलेला आहे. आडले, चांदखेड, सांगवडेपर्यंतच्या सर्व ओढाकाठच्या गावांतील नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे. भोरमधील दीवळे तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला असून पावसाच्या प्रमाणात व धरणातील येवामध्ये वाढ झालेली असल्याने दिवळे तलावाच्या सांडव्यावरून ओढा, नदीमध्ये अनियंत्रित विसर्ग सुरू झालेला आहे.

नायगाव देगाव तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला असून सद्यःस्थितीचा पावसाच्या प्रमाणात व धरणातील येवामध्ये वाढ झालेली असल्याने तलावाच्या सांडव्यावरून ओढा, नदीमध्ये अनियंत्रित विसर्ग सुरू झालेला आहे. महाकोशी तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला असून सद्यःस्थितीचा पावसाच्या प्रमाणात व धरणातील येवामध्ये वाढ झालेली असल्याने तलावाच्या सांडव्यावरून आंबवडे नाल्यामध्ये अनियंत्रित विसर्ग सुरू झालेला आहे.

नागरिकांनी नदी, नाल्या काठच्या गावांतील कोणीही नदी, नाल्या लगत जाऊ नये व योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच संबंधित ग्रामपंचायत यांना अनियंत्रित विसर्गाबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गुरुवारी (ता. १९) सकाळी आठपर्यंत सर्वाधिक पाऊस (मिमीमध्ये) पडलेली मंडले : (स्रोत कृषी विभाग) खेड ४७, चिंचवड ८२, कळस २१, थेरगाव १६, कोळवण ७२, भोर ३२, भोलावडे ३९, आंबवडे ४३, निगुडघर ७१, वडगाव मावळ ५६, कार्ला १११, आंबेगाव १९४, शिवणे ७२, परिंदवाडी ६९, टाकवे बु ७७, वेल्हा ८१, विझर ६८, जुन्नर ६२, नारायणगाव ३१, आपटाळे ८८, पाईट ५०, चाकण ६४, मंचर १८,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com