Kalammawadi Dam agrowon
ॲग्रो विशेष

Kalammawadi Dam : काळम्मावाडी धरणातून विसर्ग सुरूच, 'या' कारणास्तव धरणातील साठा कमी करण्याची वेळ

Rain In Kolhapur : पावसाचा जोर कमी झालेला असला तरी काळम्मावाडीची निर्धारित पाणी पातळी ठेवण्यासाठी अद्याप धरणातून विसर्ग सुरूच आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Rain : पावसाचा जोर कमी झालेला असला तरी काळम्मावाडीची निर्धारित पाणी पातळी ठेवण्यासाठी अद्याप धरणातून विसर्ग सुरूच आहे. या धरणातून आठ दिवसांपासून सतत पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदीपात्रात सुरू आहे. निर्धारित पातळीपर्यंत पाणी आलेले नाही. अजून दोन टीएमसी पाणी कमी करावे लागणार आहे.

यंदा काळम्मावाडी धरणाची गळती रोखण्यासाठी अस्तरीकरणाला मंजुरी मिळालेली आहे. यासाठी धरण लवकरच रिक्त करून हे काम हातात घ्यावे लागेल, अशी परिस्थिती असल्यामुळे सध्याच्या एकूण क्षमतेच्या पेक्षा कमी पाणीसाठा करणे गरजेचे ठरत आहे.

यामुळे या धरणांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात २२ टीएमसी इतका पाणीसाठा करण्याचे निश्चित झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पाणी कमी होईल तसे काम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. सततच्या पावसामुळे हे धरण वेळेच्या आधीच पूर्ण भरले. त्यानंतर गेल्या आठ दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळी वाढवून ती २४ टीएमसीपर्यंत इतकी गेली.

परिणामी वक्राकार दरवाज्यातून आणि पायथ्याच्या वीजगृहातून विसर्ग सुरू ठेवावा लागला. सध्या पाऊस पूर्ण थांबला असला तरी पाणलोट क्षेत्रातून येणारी आवक आणि विसर्ग यामुळे दूधगंगा नदीपत्राला पूर सदृश स्थिती कायम आहे.

‘राधानगरी’चा एक दरवाजा झाला बंद

दरम्यान, राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने उघडीप दिल्याने खुला असलेला एक स्वयंचलित दरवाजा आज बंद झाला. या धरणातून पायथ्याच्या वीजगृहातून पंधराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपत्रात सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT