Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan Disbursement : खानदेशात जिल्हा बँकांचे पीककर्ज वितरण उद्दिष्टापेक्षा अधिक

Crop Loan Distribution : खानदेशात यंदा पीककर्ज वितरणाची गती बरी आहे. यात राष्ट्रीय बँका पीककर्ज वितरणात हात आखडता घेत आहेत. परंतु धुळे-नंदुरबार व जळगाव जिल्हा सहकारी बँकांनी पीककर्ज वितरण गतीने केले आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा पीककर्ज वितरणाची गती बरी आहे. यात राष्ट्रीय बँका पीककर्ज वितरणात हात आखडता घेत आहेत. परंतु धुळे-नंदुरबार व जळगाव जिल्हा सहकारी बँकांनी पीककर्ज वितरण गतीने केले आहे.

जिल्हा बँकांनी आपले पीककर्ज वितरण पूर्ण करून उद्दिष्ट मागील महिन्यातच गाठले. तसेच दोन्ही जिल्हा बँकांनी उद्दिष्टापेक्षा अधिकचे पीककर्ज वितरण केले आहे. धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेला सुमारे २३६ कोटी रुपये पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट होते. या बँकेने वसुली बऱ्यैपेकी केली. वसुली केल्यानंतर लागलीच एप्रिलमध्ये पीककर्ज वितरण सुरू केले.

या बँकेतर्फे धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत पीककर्ज वितरण केले जाते. धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत या बँकेच्या शाखा आहेत. मुख्य गावे, तालुक्याच्या भागात शाखा असून, या शाखांद्वारे पीककर्ज वितरण करण्यात आले आहे. या बँकेने सुमारे २५६ कोटी रुपये पीककर्ज वितरण करून यंदा उद्दिष्ट पार केले. या बँकेचे धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत संचालक व सभासद आहेत. नवे पीककर्ज प्रस्तावही बँकेने यंदा बऱ्यापैकी निकाली काढले आहेत.

जळगाव जिल्हा बँकेनेही एप्रिलपासून पीककर्ज वितरण सुरू केले. चांगली कामगिरी करणाऱ्या सोसायट्यांच्या मदतीने सभासद शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण करण्यात आले. अनिष्ट तफावतीमधील सोसायट्यांच्या पात्र सभासदांना मात्र बँकेने थेट पीककर्ज वितरणाचा निर्णय घेतला होता. या बँकेला या वित्तीय वर्षात खरिपातील पीककर्ज वितरणासंबंधी शासनाने ९३१ कोटी रुपये पीककर्ज वितरणाचा लक्ष्यांक दिला होता.

हा लक्ष्यांक बँकेने पूर्ण केला आहे. मागील महिन्यातच बँकेने पीककर्ज वितरण लक्ष्यांक पूर्ण केला होता. बँकेने ९३६ कोटी ८३ लाख रुपये पीककर्ज वितरण केले आहे. एक लाख ५६ हजारांवर शेतकऱ्यांना बँकेने हे पीककर्ज दिले आहे. केळी, कापूस, सोयाबीन व अन्य पिकांसाठी बँकेने पीककर्ज दिले आहे. खरीप हंगाम पूर्ण होईपर्यंत म्हणजेच सप्टेंबरअखेरपर्यंत बँकेने १ हजार ५० कोटी रुपये कर्ज वितरणाचा लक्ष्यांक ठेवला आहे.

सिबिल स्कोअर कमी असतानाही कर्ज वितरण

राष्ट्रीय बँका सिबिल स्कोअर तपासून पीककर्ज देत आहेत. परंतु जिल्हा बँकांनी सिबिल स्कोअर कमी किंवा शून्य असलेल्या शेतकऱ्यांनाही पीककर्ज दिले आहे. यामुळे पीककर्ज वितरणाची गती कायम राहीली व उद्दिष्टही पूर्ण झाले आहे. सिबिल रिपोर्टसंबंधीचे शुल्क मात्र जिल्हा बँका आकारत असल्याची माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT