Pune APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC : ‘अतिक्रम’वरून संचालकाची ठेकेदाराला धक्काबुक्की

Pune APMC Encroachment : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रमुख असलेल्या शिवनेरी रस्त्यावर अतिक्रमण कारवाई केल्याच्या रागातून एका संचालकाने ठेकेदाराला धक्काबुक्की केल्याचा प्रकार नुकताच घडला आहे.

Team Agrowon

Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रमुख असलेल्या शिवनेरी रस्त्यावर अतिक्रमण कारवाई केल्याच्या रागातून एका संचालकाने ठेकेदाराला धक्काबुक्की केल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. यामुळे बाजार समितीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाजार समिती कार्यालयात सभापतींसमोरच ही घटना घडली.

अतिक्रमणांच्या विळख्यात कायम अडकलेला शिवनेरी रस्ता तत्कालीन प्रशासक मधुकांत गरड यांनी पोलिस, महापालिका आणि बाजार समितीच्या संयुक्त कारवाईतून मोकळा केला होता. अतिक्रमणमुक्त रस्ता केल्यानंतर गरड यांनी ‘पे अ‍ॅंड पार्क’ करून बाजार समितीला अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत सुरू केला होता.

मात्र, संचालक मंडळ आल्यानंतर या रस्त्यावरील अतिक्रमणांना संचालक पाठीशी घालू लागल्याचे समोर आले आहे. या संचालकाच्या कार्यकर्त्यांचे ठेले या शिवनेरी रस्‍त्यालगत आहेत. त्यांच्याविरुद्ध कारवाई केल्याचा राग संचालकाने ठेकेदारावर काढला.

काही संचालक कारवाईतील टपऱ्‍या, गुऱ्‍हाळाच्या गाड्या आदी वस्तू सोडविण्यासाठी पुढाकार घेत आहेत. गुऱ्‍हाळाची गाडी उचलल्यामुळे संचालकाने सभापतींसमोरच ठेकेदाराच्या कानशिलात लगावली.

उलट तक्रार होऊ नये यासाठी संबंधित गुऱ्‍हाळ गाडीवाल्याने पोलिसात तक्रार दिली. मात्र कारवाईचे व्हिडिओ चित्रीकरण झाल्याने तक्रारदाराचा डाव फसला. या प्रकारावर बाजार समिती प्रशासनाने अळीमिळी गुपचिळीची भूमिका घेतली आहे.

‘अतिक्रमण वाढल्याने कारवाई’

ठेकेदार बापू देशमुख म्हणाले, ‘‘शिवनेरी रस्त्यावर अतिक्रमण कारवाई करण्याची जबाबदारी बाजार समितीने आमच्यावर सोपविली आहे. शिवनेरी रस्त्यावर एकाने उसाच्या गुऱ्‍हाळाची गाडी लावून केलेल्या अतिक्रमणांवर महिनाभरापूर्वी कारवाई केली.

पुन्हा या रस्त्यावर अतिक्रमण वाढल्याने समितीने सर्व गुऱ्हाळाच्या गाड्यांवर कारवाईचा ठराव करून तशा सूचना दिल्या. त्यानुसार गाड्यांवर कारवाई करून व्हिडिओ चित्रीकरण प्रशासनाला दिले. मात्र, एका गुऱ्‍हाळ गाडीवाल्याने माझ्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. ही बाब एका संचालकाला समजल्यानंतर त्याने मला धक्काबुक्की केली.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनचे दर स्थिर, कापूस आवक सुधारतेय; काकडी व लसणाला वाढीला उठाव, मोसंबीचे दर स्थिर

Upasa Irrigation Scheme: उपसा सिंचन योजनेतून संगमनेरमधील १४ गावांचा पाणीप्रश्न सुटणार; महायुती सरकारच्या निर्णयाची विखे पाटलांकडून माहिती

Sugarcane Rate: ‘स्वाभिमानी’च्या रेट्यामुळेच सांगलीत कारखान्यांकडून ऊसदर जाहीर

Farmer Compensation: पन्हाळ्यातील ३३४० शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा

Hawaman Andaj: थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज; कोकणात कमाल तापमानाचा पारा कायम

SCROLL FOR NEXT