Pune APMC : फळे व भाजीपाला विभागात वाराई पुस्तके मिळालीच पाहिजे

Baba Adhav : मार्केट यार्डमधील फळे व भाजीपाला विभागामध्ये पुणे माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या दारासमोर वाराई पुस्तके मिळाली पाहिजे या करिता ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव यांच्या उपस्थित धरणे आंदोलन सोमवारी (ता.२०) करण्यात आले.
Baba Adhav
Baba AdhavAgrowon

Pune News : मार्केट यार्डमधील फळे व भाजीपाला विभागामध्ये पुणे माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या दारासमोर वाराई पुस्तके मिळाली पाहिजे या करिता ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव यांच्या उपस्थित धरणे आंदोलन सोमवारी (ता.२०) करण्यात आले. त्यानंतर माथाडी मंडळाचे निरीक्षक राजेश मते यांनी संबधित प्रश्नांबाबत लवकरात लवकर बैठक लावण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले.

आंदोलनावेळी श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड कामगार युनियनचे अध्यक्ष संतोष नांगरे, सचिव विशाल केकाणे, खजिनदार सूर्यकांत चिंचवले, शशिकांत नांगरे, संजय साष्टे, किसन काळे, दिपक जाधव, विजय चोरघे, विकास थोपटे, शंकर कसबे, किसन गोविंदवाड, महेंद्र केकाणे, सचिन कांदे, अमर रणदिवे, राहुल जेधे, सुरज धोंडे, धोंडू ढेबे, हमाल पंचायतचे गोरख मेंगडे, चंद्रकांत मानकर, हुसैन पठाण, शंकर मळेकर, सोमनाथ पानसरे, गणेश पानसरे, तोलणार संघटनेचे हनुमंत बहिरट, संतोष ताकवले, प्रवीण पाटील, संतोष भाडळे यांच्यासह कामगार बहुसंख्येने उपस्थित होते.

Baba Adhav
Pune APMC : पुणे बाजार समितीची संचालकपदे धोक्यात

ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव म्हणाले की, ‘‘कामगार मंत्री हे कोणत्याही प्रकारची बैठक न लावता परस्पर निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी माथाडी मंडळाला करायला लावत आहेत. त्यामुळे कामगार वर्गामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

Baba Adhav
Pune APMC : पुणे बाजार समितीत शेतीमालाच्या चोऱ्यांमध्ये वाढ

माथाडी कायद्याची तोडमोड करणारे, बोगस माथाडी कामगार असणारे संघटना, औद्योगिक क्षेत्रात जाऊन खंडणी गोळा करणारे यांच्यावर कार्यवाही न करता खऱ्या कष्टकऱ्यांवर अन्याय करण्याची भूमिका राज्य शासनाकडून होत आहे.’’

श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड कामगार युनियनचे अध्यक्ष संतोष नांगरे म्हणाले की, ‘‘मार्केट यार्ड मधील फळे, भाजीपाला विभागामध्ये कोणत्याही प्रकारचे काम न करता वाराई घेतली अशा प्रकारचा कोणताही गुन्हा आजपर्यंत नोंदला गेला नाही. तरीदेखील अशा ठिकाणी वाराई पुस्तके न देण्याचा राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचा सर्व कामगारांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com