Collector Siddharam Salimath Agrowon
ॲग्रो विशेष

Seed and Fertilizer Linking : बियाण्यांची साठेबाजी, खताची लिंकिंग झाल्यास थेट तक्रार करा

Collector Siddharam Salimath : नगर जिल्ह्यात चालू खरीप हंगामासाठी खते, बियाणे व कीटकनाशक यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र बियाण्यांची साठेबाजी किंवा लिंकिंग होत असल्यास शेतकऱ्यांनी थेट कृषी विभागाशी संपर्क करून तातडीने तक्रार नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.

Team Agrowon

Nagar News : नगर जिल्ह्यात चालू खरीप हंगामासाठी खते, बियाणे व कीटकनाशक यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र बियाण्यांची साठेबाजी किंवा लिंकिंग होत असल्यास शेतकऱ्यांनी थेट कृषी विभागाशी संपर्क करून तातडीने तक्रार नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या उपस्थितीत खरीप हंगामाबाबत आढावा बैठक झाली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गणेश पुरी, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी आशिष नवले यांच्यासह सर्व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले, की निविष्ठांची कृत्रिम टंचाई व लिंकिंग करत शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या कृषी सेवा केंद्र यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. जिल्ह्यात भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून या पथकामार्फत कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात येत आहे.

सर्व कृषी सेवा केंद्र चालकांनी शासनाच्या नियम व अटीचे पालन करावे. शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा पुरवठा वेळेत आणि रास्त भावात करून द्यावा. सर्व निविष्ठाचा साठा व भावफलक दैनंदिन दुकानाबाहेर शेतकऱ्यांना दिसेल अशा पद्धतीने लावण्यात यावा. तसेच ज्या कृषी सेवा केंद्रामध्ये बियाणे आणि खते भावफलक व साठाफलक लावलेला नसेल अशा सर्व कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. सालीमठ यांनी यावेळी दिले.

तक्रारीसाठी संपर्क क्रमांक

बियाण्यांची साठेबाजी किंवा लिंकिंग होत असल्यास शेतकऱ्यांनी तक्रार करण्यासाठी

टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० किंवा ९८२२४४६६५५ या क्रमांक दिले आहेत. या क्रमांकावर किंवा नजीकच्या कॄषी कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Beekeeping Business: मधुमक्षिका पालन; कमी खर्चात जास्त नफा देणारा शेतीपूरक व्यवसाय!

Farmer Protest: पातुर्डा येथे राज्यव्यापी हक्क परिषदेत शेतकरी नेते कडाडले

Agrowon Diwali Article: सुखी माणसाचा सदरा गवसतो तेव्हा...

Sugarcane Worker Issue: ऊस तोडणी कामगारांना फरक न दिल्यास संप

Development Project: मावळ तालुका कृषी विकासाचा आदर्श बनेल : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

SCROLL FOR NEXT