Agriculture Seeds and Input Scarcity : बियाणे, खते, कीटकनाशकांची कृत्रिम टंचाई केल्यास कारवाई

IAS Raja Dayanidhi : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक बी-बियाणे, खते, कीटकनाशके वेळीच उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभागाने अधिक दक्षता घ्यावी. बी- बियाणे, खते, कीटकनाशके यांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
IAS Raja Dayanidhi
IAS Raja Dayanidhi Agrowon
Published on
Updated on

Sangli News : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक बी-बियाणे, खते, कीटकनाशके वेळीच उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभागाने अधिक दक्षता घ्यावी. बी- बियाणे, खते, कीटकनाशके यांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार (ता. ११) खरीप हंगामाचा आढावा घेतला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक सुरेंद्र पाटील उपस्थित होते. बैठकीस जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि कृषी सेवा केंद्रांचे प्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

IAS Raja Dayanidhi
Agriculture Seeds and Input Sales : बियाणे, निविष्ठा विक्रीवर राहणार कृषी विभागाच्या पथकांची नजर

जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘खरीप हंगामासाठी बी-बियाणे, खते, कीटकनाशकांचा साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना त्वरित तो उपलब्ध व्हावा. या बरोबरच बोगस बी- बियाणे, खते, कीटकनाशके विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. या संदर्भात जिल्ह्यात कोणतीही तक्रार येऊ नये, यासाठी कृषी विभागाने सतर्क राहावे.

IAS Raja Dayanidhi
Unauthorized Seeds : अनधिकृत बियाण्यांचे गुजरात कनेक्शन

जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्राकडे उपलब्ध असलेल्या साठ्याची कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियमित तपासणी करावी. कृषी सेवा केंद्राकडे उपलब्ध साठ्याची माहिती ग्रामपंचायत व गावचावडीमध्ये प्रसिद्ध करावी.’’

ते म्हणाले, ‘‘३० जूनपर्यंत पीककर्ज वाटप पूर्ण करावे. याबाबत तालुकास्तरावर पीक कर्ज वाटपाचा आढावा घ्यावा. कृषी विभागाने पीक विमा योजना जनजागृती करावी. गतवर्षी शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी केवायसी अपडेट करून घ्यावे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पेरणी बाबतचा सल्ला द्यावा. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत.’’ पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकरी खातेदाराच्या खात्यावर जमा होण्यासाठी ज्यांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले नाही त्यांचे रजिस्ट्रेशन पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी बैठकीत दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com