Shekhar Gaikwad
Shekhar Gaikwad Agrowon
ॲग्रो विशेष

Shekhar Gaikwad : अतिहुशारी अंगलट आली

शेखर गायकवाड

एकदा एका आमदारांनी त्यांच्या मतदार संघातील एका गावाला भेट दिली. गावातील सरपंच आणि गावकऱ्यांशी चावडीवर बसून गावच्या प्रश्नांबाबत विस्तृत चर्चा केली.

आमदारांशी चर्चा करीत असताना गावातील लोकांनी एकमुखाने गावाजवळ एक मोठा गावतलाव बांधण्याची मागणी केली.

गाव सभेसमोर आमदारांनी त्यांच्या भाषणामध्ये गावतलाव बांधण्याची घोषणा केली आणि च्या कार्यकर्त्यांना व ग्रामसेवकाला पुढील कार्यवाही तत्काळ करण्याच्या सूचना दिल्या.

गावासमोर आमदारांनी एवढी मोठी घोषणा केल्यावर आत्माराम नावाच्या गावातल्या एका शेतकऱ्याने आठ ते दहा दिवसांतच त्याच्या तलावाजवळच्या शेतात एक विहीर खोदायला सुरुवात केली.

विहीर खोदकाम सुरू असताना गावातल्या काही लोकांनी आत्मारामला विचारले की, ‘‘अरे आत्माराम, तुला माहीत आहे ना इथे खाली पाच ते दहा फुटांवर खोदल्यानंतर जमिनीमध्ये कठीण खडक लागतो आणि त्याला पाणी सुद्धा लागत नाही! मग तू कशासाठी इथे विनाकारण विहीर खोदून पैसे खर्च करतो?

आता तलावाखाली जमीन जाणार आणि तुझे विहिरीचे पैसे पण वाया जाणार!" त्यावर आत्माराम म्हणाला, ‘‘गाव तलाव होईल तेव्हा होईल पण आज मला माझ्या शेतासाठी पाणी कमी पडत आहे.’’

आत्मारामने त्याच्या विहिरीचे खोदकाम चालूच ठेवले आणि एक महिन्यानंतर विहिरीचे खोदकाम करीत असताना जमिनीमध्ये कठीण खडक लागला. विहिरीला थेंबभर सुद्धा पाणी लागले नाही. तेव्हा आत्मारामने बारा-तेरा फुटांवर विहिरीचे खोदकाम बंद केले.

आत्मारामने विहिरीच्या खोदकामात जवळपास २५ हजार रुपये खर्च केले. एवढा खर्च करून फक्त त्या जागेवर एक १२-१३ फुटाचा खड्डा खणला गेला, पण केलेल्या कामाचा काहीही उपयोग झाला नाही.

पुढची दोन-चार वर्षे अशीच उलटली तरी गाव तलावाचे काम सुरू झाले नाही. जमीन जर तलावात गेली तर विहिरीचे पण मूल्यांकन २-४ लाख रुपये सहजपणे मिळतील असा आत्मारामने केलेला विचार फसला होता. सरकारकडून जास्त पैसे मिळवण्याचा आत्मारामचा संपूर्ण डाव त्याच्यावरच उलटला.

सांगायचे तात्पर्य म्हणजे सरकारकडून जमिनी बरोबर विहिरीचेही पैसे उकळण्याचा डाव कधी-कधी अतिहुशारीने असा अंगलट येऊ शकतो व त्यात स्वतःचे नुकसान सुद्धा होऊ शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pre Monsoon Precautions : मॉन्सूनपूर्व सर्व कामे यंत्रणांनी वेळेत पूर्ण करावीत

Agriculture Fertilizer : खतांचे दोन लाख २० हजार टन आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर

Illegal Seeds : सीमावर्ती भागात बेकायदा बियाणे गुणनियंत्रणच्या रडारवर

Pre-Kharif Review Meeting : गावनिहाय पीक उत्पादन आराखडे वेळेत तयार करावेत

Agriculture Cultivation : रत्नागिरीत लागवडीखालील क्षेत्र ४ हजार हेक्टरने घटले

SCROLL FOR NEXT