MAIDC Agrowon
ॲग्रो विशेष

MAIDC : ‘कृषी उद्योग विकास’मध्ये दिव्यांग कर्मचाऱ्याला त्रास

Harassment to a Disabled Employee : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या येथील विभागीय कार्यालयात कार्यरत उमेश भारसाकळे या दिव्यांग कर्मचाऱ्याला काम न देता त्रास दिला जात असल्याची तक्रार राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे ३१ मार्च २०२४ ला केली आहे.

Team Agrowon

Akola News : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या येथील विभागीय कार्यालयात कार्यरत उमेश भारसाकळे या दिव्यांग कर्मचाऱ्याला काम न देता त्रास दिला जात असल्याची तक्रार राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे ३१ मार्च २०२४ ला केली आहे. कार्यालयात अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाला न्याय मिळण्याची मागणी केली आहे.

श्री. भारसाकळे यांनी दिलेल्या अर्जात म्हटले, की ते मागील ६ वर्षांपासून या कार्यालयात कंत्राटी लिपिक म्हणून काम करीत आहेत. दोन्ही पायांनी अपंग असून आजवर आवक-जावक विभागाचे काम करीत होते. आता हे काम काढून घेण्यात आले असून कुठलेही काम न देता बसून ठेवले जाते. शिवाय सातत्याने त्रास दिला जात आहे.

बीए बीएडपर्यंत शिक्षण घेतले असून उच्चशिक्षित आहे. लेखा व प्रशासन अधिकारी मिलिंद तायडे यांच्याकडून योग्य वागणूक मिळत नाही. या प्रकरणी न्याय द्यावा अन्यथा आचारसंहिता संपल्यानंतर उपोषण करण्याचा इशारा उमेश भारसाकळे यांनी दिला आहे.

संबंधित कर्मचाऱ्याला कुठलेही संगणकीय काम येत नाही. मराठी टायपिंग, शॉर्टहँड येत नाही. गेल्या चार-पाच वर्षांत त्यांनी याबाबत काहीही प्रगती केली नाही. शिवाय तक्रारीत केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही.
चेतन साळुंखे, व्यवस्थापक, महाराष्‍ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, विभागीय कार्यालय, अकोला
संबंधित कर्मचाऱ्याला कार्यालयीन दृष्ट्या संगणकीय कामकाज येत नाही. त्यांना ते शिकून घेण्याचे सांगितले. पण त्यांची शिकण्याची मानसिकता नाही. त्यांना आपण कुठलाही वैयक्तिक त्रास देण्याचा काहीच मुद्दा नाही.
मिलिंद तायडे, प्रशासन अधिकारी, एमएआयडीसी, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT