Land Record Agrowon
ॲग्रो विशेष

Online Satbara : ‘सर्व्हर डाउन’मुळे सातबारा उताऱ्यासाठी शेतकऱ्यांना मनस्ताप

Bhumi Abhilekh : सोलापूर जिल्ह्यासह राज्यात भूमिअभिलेख सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे गेल्या दोन दिवसांपासून सातबारा उतारे देणे बंद आहे.

सुदर्शन सुतार

Solapur News : सोलापूर जिल्ह्यासह राज्यात भूमिअभिलेख सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे गेल्या दोन दिवसांपासून सातबारा उतारे देणे बंद आहे. परिणामी, सातबारा उतारे मागणीसाठी सीएससी सेंटर्स, महा ई-सेवा केंद्रावर शेतकऱ्यांना मात्र हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.

सर्व्हरमध्ये यापूर्वीही सातत्याने असा बिघाड झालेला आहे, त्यामुळे सततच्या या प्रकाराने शेतकऱ्यांना मात्र मनस्ताप होत आहे. शेतकऱ्यांना विविध संस्था, बँकांकडून घेतलेले कर्ज नूतनीकरण करण्यासह वारस नोंद, शेती वाटपाची नोंद, शेतकऱ्यांच्या विविध योजना, शेतीमोजणी, शेती खरेदी-विक्री आदी विविध कामासाठी डिजिटल सात-बाराची गरज भासते.

त्यातच जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्रेही बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सीएससी सेंटर्स आणि महा ई-सेवा केंद्रांचा पर्याय आहे. पण सर्व्हर डाउनमुळे तिथूनही उतारे मिळत नसल्याने हेलपाटे मारण्याशिवाय शेतकऱ्यांकडे काहीच राहिलेले नाही.

काही ठिकाणी तलाठ्यांकडे ऑफलाइन उतारे मिळवण्यासाठी प्रयत्न केला जातो आहे. पण गावपातळीवरील हे भाऊसाहेबही अनेक वेळा जागेवर नसतात किंवा असतील तर तेही काही तरी तांत्रिक अडचणी सांगून टाळतात, त्यामुळे दोन्ही बाजूंनी शेतकऱ्यांची कोंडी होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Price : आर्णी बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली

Pomegranate Farming : सर्कलवाडी येथे डाळिंब बहार व्यवस्थापनासाठी शिवार फेरी

Water Crisis: कासारी नदीचे पात्र कोरडे; १४ गावांतील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

Sangamner Road Development : संगमनेर तालुक्यात रस्त्याच्या कामासाठी तीन कोटी निधी

Drought Relief: पंचनाम्यांत वेळ कशासाठी घालवता? निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या, बाळासाहेब थोरातांची मागणी

SCROLL FOR NEXT