Online Satbara : आता एका क्लिकवर सातबारा होणार दुरूस्त, असा करा ऑनलाईन अर्ज

Satbara Online Application : सातबाऱ्यात चुका आहेत ते जमीन मालक ऑनलाइन अर्ज करीत आहेत. १ ऑगस्टपासून ही सुविधा सुरू आहे.
Online Satbara
Online SatbaraAgrowon
Published on
Updated on

Online Satbara : सातबारा उताऱ्यावर आपल्या चुका दुरूस्त करण्यासाठी तलाठी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. दरम्यान जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाकडून सातबारा उताऱ्यावरील नाव, क्षेत्रांमधील चूक बदलण्याची मोहीम राज्यभर सुरू आहे. ज्यांच्या सातबाऱ्यात चुका आहेत ते जमीन मालक ऑनलाइन अर्ज करीत आहेत. १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत ७ हजारांहून अधिक लोकांनी अर्ज सादर केले आहेत.

यामध्ये कोल्हापूर, सातारा, कोकण पुणे या भागातून सर्वाधिक मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. तर पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक १३४० सातबारा दुरूस्तीसाठी आले आहेत. अर्जांबाबत सुनावणी घेऊन, त्यातील बदलांबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश राज्यातील तहसीलदारांना देण्यात आले आहेत.

महसूल विभागाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या राज्य संचालक सरिता नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्ज संबंधितांकडे गेल्यानंतर तलाठी संबंधित कागदपत्रांचे पुरावे तपासून त्याची पूर्तता करत आहेत. याप्रमाणे सातबारा उताऱ्याच्या दुरुस्तीची प्रक्रिया सुरु आहे. अर्जावर तातडीने सुनावणी घेऊन निर्णय द्यावा, असे निर्देश सर्व तहसीलदारांना दिल्याची माहित नरके यांनी दिली.

सातबारा दुरुस्तीसाठी आलेले अर्ज तहसीलदारांच्या पातळीवर प्रलंबित असून, ते लिखित स्वरूपात असल्याने प्रलंबित राहिले आहेत. आता ऑनलाइन दिलेले अर्ज किती स्वरूपात प्रलंबित आहेत, याचे रेकॉर्ड ठेवणे शक्य आहे. नागरिकांनी 'ई हक्क पोर्टलवरून सातबारा-फेरफारवर क्लिक करून अर्ज करावा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Online Satbara
Online Satbara : ऑनलाइन सातबारामुळे मिळाला वनावरील हक्क

राज्यभरातून ७ हजार अर्ज दाखल

अकोला ३०, सिंधुदुर्ग १४७, अमरावती १२७, गडचिरोली २५, बुलढाणा १९९, गोंदिया ४५, यवतमाळ ८१, चंद्रपूर ५६, वाशिम ५३, नागपूर १४८, धाराशिव १६५, भंडारा ५९, संभाजीनगर ३३२, वर्धा १२९, जालना १६९, नगर ४८०, नांदेड ७८, जळगाव १९१.

परभणी २७०, धुळे १२६, बीड ८४, नाशिक ३१८, लातूर १२५, नंदुरबार ४८, हिंगोली १९, कोल्हापूर ३१९, ठाणे १२६, पुणे १३४०, पालघर १३४, सातारा ४६५, मुंबई उपनगर १, सांगली ४३३, रत्नागिरी ३२१, सोलापूर ३५५, रायगड १७८, एकूण ७, १४८ जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com