Donkey Milk Agrowon
ॲग्रो विशेष

Donkey Milk : धारावीत चमचाभर दुधासाठी मोजावे लागतात ५० रूपये

Donkey’s Milk in Dharavi : मागे चार एक वर्षांपुर्वी मुंबईत गाढविणीच्या दुधावरून जोरदार चर्चा झाली होती. येथील धारावीत गाढविणीच्या दुधाला मोठी मागणी असल्याचे समोर आले होते. तर तेथे चमचाभर दुधासाठी ५० रूपये द्यावे लागत असल्याचे समोर आले होते.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : आपल्याकडे प्रामुख्याने गाई, म्हैस आणि शेळी याच्या दुधाचे सेवन केले जाते. लहान मुलांना हे दूध फार फायदेशिर असते. त्यामुळे अनेकदा लहान मुलांना हे गाई, म्हैस आणि शेळीचे दूध प्यायला दिले जाते. मात्र मागे चार एक वर्षांपुर्वी मुंबईच्या धारावीत गाढविणीचे दूध लहान बालकांना दिले जात असल्याचे समोर आले होते. तसेच ते दूध ५० रूपये फक्त एक चमचा विकला जात होता हे देखील उघड झाले होते. तर सर्दी, खोकला सारखे आजार बरे होतात असा विश्वास त्यावेळी सुभाष जाधव या गाढव बाळगणाऱ्या व्यक्तीने व्यक्त केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा धारावी चर्चेत आली असून येथे पुन्हा गाढविणीचे दूध लहान बालकांना दिले जात आहे. याबाबत टीओआयमध्ये वृत्त आले असून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

रोगप्रतिकारक शक्ती

आपल्याकडे लहान मुलांचे संगोपन करताना दूध नक्की दिले जाते. दुधात प्रथिने, जीवनसत्वे, कॅल्शियम आणि ड जीवनसत्व असल्याने ते प्यापया दिले जाते. तर गाय, म्हैस, शेळी, बकरीचे दूध हे प्रमुख्याने दिले जाते. पण आपण गाढवाचे दूध कधी ऐकले आहे का? ते इतर ठिकाणी पिले जाते असे म्हणतात. तर त्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे तत्व असतात असेही म्हटलं जाते.

गढावाचे दूध

पण सध्या मुंबई येथील धारावी परीसरात गढावाचे दूध राजरोस पणे विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चार वर्षांपुर्वी सुभाष जाधव नावाचा व्यक्ती अशा पद्धतीने गाढविणीचे दूध दारोदार फिरून विकत होता. त्यानंतर ता पुन्हा एकदा धारावी परीसरात गढावाचे दूध विकले जात आहे.

धारावीत गढावाचे दूध

धक्कादयक म्हणजे याही वेळी एक व्यक्ती गढावाचे दूध धारावीमध्ये फिरत विकत आहे. तसेच तो हे दूध रोगप्रतिकारक असल्याचा दावा करत आहे. याबाबत टीओआयने दिलेल्या वृत्तात, गाढवाचे दूध हे रोगप्रतिकारक असल्याचा दावा त्या व्यक्तिकडून केला जात आहे.

लहान मुलांना कारगार

तसेच त्या गाढवीणीचे दूध हे सर्दी, खोकला ताप, डोळ्यावरील ताण, दात आणि शरीराचा अशक्तपणा, अस्थमा अशा आजारांवर लहान मुलांना कारगार आहे. तर हे दूध मुलांना तंदुरुस्त बनविण्यासह त्यांच्या गुप्तेंद्रीयात असलेली समस्या दूर करतो असाही दावा त्या व्यक्तिकडून केला जात आहे.

दूध फायदे आहेत?

विशेषबाब म्हणजे धारावीमध्ये विकले जाणारे दूध हे मुलांच्या माता आणि घरातील इतर पालक स्वत: घेत आहेत. तसेच ते त्यांच्या मुलांना ते देत आहेत. तेही प्रति चमचा ५० रूपये देऊन. याबाबत मुंबई महापालिकेचे डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, गाढवाचे दूध हे चांगले असते. पण अशा पद्धतीने डॉक्टरांचा सल्ला न घेता लहान व नवजात बालकांना थेट दूध देणे घातक असल्याचे म्हटलं आहे.

बालरोगचिकीत्सकांचा इशारा

तसेच एका बालरोगचिकीत्सकांनी यावरून इशारा देताना, कोणत्याही प्राण्याचे कच्चे दूध मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते असे म्हटलं आहे. तसेच त्यांनी, गाढवाच्या दूधात प्रोटीन कमी आणि चरबी अधिक असते जे गाईच्या दूधाच्या तुलनेत मुलांसाठी चांगले असते असे म्हटलं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Development: कृषी आराखड्यात अधिकारी, कर्मचारी महत्त्वाचा दुवा

Use of BioFertilizers: जमिनीचा कस वाढवणारे उपयुक्त सूक्ष्मजीव आणि त्यांचे फायदे

Silk Development: ‘रेशीम विभाग आपल्या दारी’ मोहीम राबवणार

Rural Development: नऊ गावांमध्ये विकासकामांचा दुष्काळ

Rabi Crop Management: शाश्‍वत रब्बी पीक उत्पादनासाठी मृद् व जलसंधारण

SCROLL FOR NEXT