Rural Development Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Development : खेड्याच्या शाश्‍वत विकासाशिवाय देशाचा विकास अशक्य

Village Development : लोकसहभागातून खेड्याचा शाश्‍वत विकास झाल्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही, असे प्रतिपादन माजी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केले.

Team Agrowon

Chh. Sambbhajinagar News : लोकसहभागातून खेड्याचा शाश्‍वत विकास झाल्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही, असे प्रतिपादन माजी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केले.

ग्रामविकास संस्था रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ग्रामविकास भवन, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित ग्रामविकासाची सद्यःस्थिती-आव्हाने व उपाययोजना कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून बोलत होते. याप्रसंगी डॉ. सर्जेराव ठोंबरे, नरहरी शिवपुरे, डॉ. भगवानराव कापसे, कैलास तवार, अप्पासाहेब उगले, मनोहर सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. भापकर म्हणाले, की गाव हेच मंदिर समजून सरपंचांनी गावच्या सर्वांगीण विकासाकरिता नियोजनबद्ध कालबद्ध कार्यक्रम राबवावा. डॉ. ठोंबरे म्हणाले, की कार्यशाळेला उपस्थिती सर्वजण सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्यक्ष कृती करणारे आहेत.

त्यामुळे या कार्यशाळेला विशेष महत्त्व आहे. विकसित भारत समर्थ भारताकरिता ग्रामीण भागाचा विकास होणे ही काळाची गरज आहे. कार्यशाळेत अनुक्रमे ग्रामविकासाची सद्यःस्थिती आव्हाने व उपाययोजना, शेती, स्वयंरोजगार,शिक्षण या विषयावर डॉ. भगवानराव कापसे, सुनील कस्तुरे, श्रीकांत कुलकर्णी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

याप्रसंगी अरविंद केंद्रे, प्रा. जयप्रकाश बागडे, अशोक गुरनाळे, रामचंद्र पिल्दे, दिगंबर निकाळजे, शिवाजीराव घुगे, प्रा. उषा वाटणे, बाबासाहेब गोजरे, दादासाहेब शिंदे, राम वाघ, अर्जुनराव ढगे, मीनाक्षी बिराजदार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती खरटमल यांनी तर आभार बालाजी बिरादार यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर ओसरणार

Sugar Rate : श्रावणातील वाढत्या मागणीमुळे साखरेचे दर वाढण्याची शक्यता

Cooperative Institute Maharashtra : सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

SCROLL FOR NEXT