Agriculture News
Agriculture News Agrowon

Rural Development : कर्नाटकातील शेतकरी मराठवाड्यातील बांधावर

Farmers Tour : ग्रामविकासाचे मॉडेल समजून घेण्यासह शेती फायद्याची करण्यासाठी शेतकरी वापरत असलेले तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी कर्नाटकाच्या बिदर जिल्ह्यातील २७ शेतकरी दोन दिवस मराठवाड्यात आले होते.
Published on

Chh. Sambhajinagar News : ग्रामविकासाचे मॉडेल समजून घेण्यासह शेती फायद्याची करण्यासाठी शेतकरी वापरत असलेले तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी कर्नाटकाच्या बिदर जिल्ह्यातील २७ शेतकरी दोन दिवस मराठवाड्यात आले होते. जो उद्देश घेऊन इकडे आलो होतो, बुधवार (ता.११) परत जाताना शेती बदलासाठी बरीचशी शिदोरी घेऊन जात असल्याची भावना शेतकऱ्यांनी परतत असताना बोलून दाखवली.

कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील औराद तालुक्यांतर्गत येत असलेल्या खेर्डा व भंडारकुमटा या दोन गावांतील सुमारे २७ शेतकरी सोमवारी (ता. ९) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दाखल झाले. अशोक नाईक, गोपाळ पाटील, बालाजी रेड्डी, काशिनाथ स्वामी, अप्पाराव बिरादार, ज्ञानेश्‍वर मुळे आदी शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश होता.

मंगळवारी (ता. १०) गावांचा विकास नेमका कसा साधता येईल यासाठीचे रोल मॉडेल म्हणून महाराष्ट्रात ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा या गावाला भेट त्यांनी भेट दिली. भास्कर पेरे पाटील यांची ग्रामविकासाची संकल्पना प्रत्यक्षात कशी अवतरली हे समजून घेतल.

Agriculture News
Rural Development : हिवरे बाजार भेटीतून जीवनात प्रेरणा मिळते : डॉ. शिशिर चंद्र

त्यानंतर माळीवडगाव (ता. गंगापूर) येथील गोरखनाथ गोरे या शेतकऱ्याच्या गांडूळ युनिटला भेट देऊन शेतीत गांडूळ खताचे महत्त्व समजून घेतले. गांडूळ खत आणि त्याची होत असलेली निर्यात बघून शेतकरी चकित झाले.

Agriculture News
Rural Development : धोरण ग्राम विकासाचे...

त्यानंतर बुधवारी (ता.११) देवगाव (ता. पैठण) येथील दीपक जोशी यांच्या शेतीला भेट देऊन शून्य मशागत शेतीचे फायदे, तण देई धन ही संकल्पना शेतकऱ्याला कशी अमलात आणता येईल याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेतली. याच वेळी देवगाव येथील ग्रामपंचायतच्या माध्यमातून झालेल्या विकास कामाची व कार्बन क्रेडिटच्या संकल्पनेची सविस्तर माहिती घेतली.

आमच्यातील काही जण नोकरीनंतर शेती करण्यासाठी पुढे आले आहेत. दोन दिवस फिरल्यानंतर आमच्याकडील शेतीत महाराष्ट्रात होत असलेल्या शेतीतून काय काय घेता येईल याची बरीच माहिती मिळाली. शेतच नव्हे तर गाव तसं पुढे आणता येईल याचीही जाणीव आम्हाला झाली.
- अशोक नाईक, खेर्डा ता औराद जि. बिदर (कर्नाटक)
शेतातलं तन पैसेच खात असं वाटायचं. आता ते फायद्याचं कसं ठरू शकतं याची जाणीव मनाला झाली. हे तंत्र आमच्या भागात वापरण्यासाठी आम्ही नक्कीच पुढाकार घेऊ.
- काशिनाथ स्वामी, खेर्डा, ता.औराद, जि. बिदर (कर्नाटक)
मी पदव्युत्तर शिक्षण घेण्यासोबतच शेती करतो तूर, सोयाबीन, उडीद, मूग ही आमची पिकं दोन दिवसांच्या शेतकरी सहलीतून महाराष्ट्रात शेतकरी प्रगत शेती करतोय याची जाणीव झाली. तुलनेने आम्ही बरेच मागे आहोत. इथून परत जाताना शेती आणि ग्रामविकास संदर्भात मिळालेले ज्ञान आमच्या नक्की फायद्याचे ठरेल.
- ज्ञानेश्वर मुळे, भंडारकुमटा, ता. औराद, जि. बिदर(कर्नाटक)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com