Narayan Rane Agrowon
ॲग्रो विशेष

Department of MSME : टेक्नॉलॉजी सेंटरमुळे सिंधुदुर्गच्या विकासाला गती

Narayan Rane : केंद्रांच्या लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग विभागामार्फत टेक्नॉलॉजी सेंटर उभारले जात असून या सेंटरमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.

Team Agrowon

Sindhudurg News : केंद्रांच्या लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग विभागामार्फत टेक्नॉलॉजी सेंटर उभारले जात असून या सेंटरमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.

सिंधुदुर्गनगरी येथे २० एकर जागेत १७५ कोटी २८ लाख रुपये खर्चून अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सेंटरची उभारणी केली जाणार आहे. या केंद्राचे भुमिपूजन मंत्री श्री. राणे यांच्या हस्ते सोमवारी (ता. ११) झाले.

या कार्यक्रमाला उद्योग विभागाचे अपर सचिव डॉ. रजनीश, जिल्हाधिकारी किशोर तावडे, नागपूर येथील संचालक प्रशांत पार्लेवार, सहसंचालक राहुल कुमारमिश्रा, प्रभाकर सावंत, नीलेश राणे, मनिष दळवी, राजन तेली आदी उपस्थित होते.

श्री. राणे म्हणाले, की उद्योग विभागामार्फत देशात १८ टेक्नॉलॉजी सेंटर मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. या सेंटरमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र म्हणून हे केंद्र ओळखले जाणार आहे. या केंद्रांमुळे जिल्हा विकासाला गती मिळेल.

डॉ. रजनीश म्हणाले, की चांद्रयान मोहीम यशस्वी झाली असून त्यामध्ये वापरण्यात आलेले पाचशेहून अधिक पार्ट टेक्नॉलॉजी सेंटरमधील आहेत. त्यामुळे भारताच्या प्रगतीसाठी सिंधुदुर्गमधील हे सेंटरदेखील चांगले काम करेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Janjira Fort Jetty : जंजिरा जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच खुली होणार

Crop Damage Compensation : पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त पावसाच्या मंडलात भरपाईचे प्रयत्न

Crop Damage Compensation : नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणारच

Karnataka | शेतजमिनीसाठी एकरी ३० ते ४० लाख दर; अप्पर कृष्णा प्रकल्पासाठी भूसंपादन

Nidva Cane Subsidy : ‘क्रांतिअग्रणी’कडून निडवा उसाचे अनुदान शेतकऱ्यांना अदा

SCROLL FOR NEXT