Market Bulletin: सोयाबीन दरात सुधारणादेशातील बाजारात आज सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे १०० रुपयांपर्यंत सुधारणा पाहायला मिळाली. प्रक्रिया प्लांट्सचे सोयाबीन खरेदीचे भाव ५ हजार ५०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ३०० रुपये दर मिळाला. बहुतांशी बाजारांमध्ये आज सुधारणा झाली होती. आंतररष्ट्रीय बाजारातही सोयाबीनच्या भावात सुधारणा पाहायला मिळत आहे. देशातील बाजारात सोयाबीनची आवकही कमी झालेली आहे. त्यामुळे सोयाबीनचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केल आहे. .कापूस दबावातचदेशातील बाजारात कापसाच्या भावात स्थिरता असली तरी दर दबावातच आहेत. मागील काही दिवसांपासून बाजारातील आवक कमी दिसत असली तरी सरासरीपेक्षा अधिक आहे. सीसीआयच्या कापूस खरेदीच्या बंद करण्याच्या निर्णयाने देशातील बाजारात आवक वाढली होती. खरेदीला आता १५ मार्चपर्यंत मुदत वाढल्याने आवक पुन्हा अधिक राहणार आहे. सध्या बाजारात कापूस प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. कापसाच्या भावावरील दबाव कायम राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Sugar Production: साखर उत्पादनात १२ टक्के वाढ होणार.हरभरा आवक वाढलीदेशातील बाजारात हरभऱ्याची आवक वाढलेली आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि राजस्थान राज्यातील बाजारांमध्ये नव्या मालाची आवक वाढलेली आहे. याचा दबाव दरावर आलेला आहे. राज्यात हरभरा खरेदीला सुरुवात करण्यात आलेली आहे. मात्र नाव नोंदणीलाही कालपासूनच परवानगी दिली आहे. त्यातच दोन दिवस साणांचे असल्याने खेरदी आणि नोंदणी उशीराच होऊ शकते. आवकेमुळे सध्या भाव सरासरी ४ हजार ८०० ते ५ हजार १०० रुपयांच्या दरम्यान हरभरा विकला जात आहे. हरभऱ्याचा भाव काही दिवस या पातळीच्या दरम्यान दिसू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Chana Import: हरभऱ्याच्या आयातीत तिप्पट वाढ.आल्याचे भाव टिकूनराज्यातील बाजारात आल्याचे भाव टिकून आहेत. सध्या बाजारातील आल्याची आवक काहीशी कमी झालेली आहे. तर लग्नसराई आणि समारंभामुळे आल्याला चांगला उठाव आहे. त्यामुळे आल्याचे भाव टिकून आहेत. सध्या बाजारात आले ४ हजार ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलने विकले जात आहे. आल्याची बाजारातील आवक पुढील काही आठवडे स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आल्याचा भावही टिकून राहू शकतो, असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..मिरची उठाव टिकूनराज्यातील बाजारात हिरव्या मिरचीची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. मिरचीची बाजारातील आवक गेल्या काही महिन्यांपासून एका पातळीच्या पुढे सरकलेली नाही. तर दुसरीकडे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे. यामुळे दरात काहीशी सुधारणा दिसून आली आहे. सध्या हिरवी मिरची सरासरी ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. मिरचीची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.