Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Rate : प्रतीक्षा करूनही वाढेनात कापसाचे दर

Cotton Market : कापूस घरात साठवण्यामुळे अडचणी मात्र तयार झाल्या. परिणामी, आता अनेकांनी कापूस विक्रीला सुरुवात केली आहे.

Team Agrowon

Akola News : महिनोन् महिने दरवाढीची अपेक्षा ठेवून घरात साठवून ठेवलेला कापूस आता शेतकरी हंगामाच्या तोंडावर विक्रीला काढू लागले आहेत. दरतर वाढले नाहीतच शिवाय कापूस घरात साठवण्यामुळे अडचणी मात्र तयार झाल्या. परिणामी, आता अनेकांनी कापूस विक्रीला सुरुवात केली आहे.

पश्‍चिम विदर्भात अकोला, बुलडाणा, वाशीम व इतरही जिल्ह्यांत खरिपात सोयाबीननंतर कपाशी हेच दुसरे मुख्य पीक आहे. या वर्षात विविध संकटांना तोंड देत कापूस हंगाम आटोपला. काही शेतकऱ्यांना सरासरी एकरी सहा क्विंटलपासून, तर १० क्विंटलपर्यंत उतारा लागलेला आहे.

चांगले व्यवस्थापन करणाऱ्यांचा उतारा याहीपेक्षा अधिक आहे. या वर्षात १० हजारांवर कापसाला दर मिळेल याची हंगामाच्या सुरुवातीपासूनच अपेक्षा लागलेली होती. परिणामी बऱ्याच शेतकऱ्यांनी पहिल्या-दुसऱ्या वेचणीपासूनचा कापूस साठवून ठेवण्यास प्राधान्य दिले.

हंगामाच्या सुरुवातीला साडेआठ ते नऊ हजारांचा दर निघाला होता. वेचणीच्या काळात पाऊस झाल्याने कापसात ओलसरपणा वाढला. परिणामी, हा कापूस साडेसहा हजारांपर्यंत दराने खरेदी झाला. नंतर चांगल्या कापसाचा दर सात ते आठ हजारांदरम्यान फिरत होता.

फारच थोड्या लोकांना आठ हजारांवर दर मिळाल्याची वस्तुस्थिती आहे. यंदाच्या खरीप हंगामाला लवकरच सुरुवात होत असून, अनेकांच्या घरात कापूस तसाच पडून आहे. दरवाढीच्या दृष्टीने साठवलेला कापूस आता अवघा सात ते साडेसात हजारांदरम्यान विकत आहे.

पुढील काळात दरवाढीचे संकेत नसल्याने घरात पडून असलेला कापूस आता विक्री होऊ लागला. खेडा खरेदीत सध्या साडेसात हजारांच्या आतच व्यापारी हा कापूस खरेदी करीत आहेत. अद्यापही ३० टक्के कापूस उत्पादकांच्या घरात कापूस पडून असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही शेतकऱ्यांकडे तर मागील हंगामाचाही कापूस अद्याप आहे. दरवाढ होत नसल्याने साठवणूक करणारे शेतकरी विवंचनेत सापडले आहेत.

मे महिन्यापर्यंत कापूस ठेवूनही हातात निराशाच आली. या वर्षी कधी जास्त पाऊस झाला तर कधी पावसाने उघडीप दिली. त्यामुळे उत्पन्नात खूप मोठी घट झाली. एकरी तीन ते चार क्विंटल कापूस झाला. शेतकऱ्यांनी मे महिन्यापर्यंत कापूस ठेवूनसुद्धा कापसाची भाववाढ झाली नाही. आता ७००० ते ७३०० दरम्यान कापूस विकावा लागत आहे. एक क्विंटल कापूस घरी आणण्यासाठी शेतकऱ्याला नऊ ते दहा हजार रुपये खर्च येतो आणि कापसाला भाव हा ७३०० भेटतो आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक पेरावे की नाही, हा मोठा प्रश्‍न तयार झाला. सरकारच्या आयात निर्यात धोरणात शेतकऱ्यांचा बळी जात आहे.
विनोद भोयर, कापूस उत्पादक, सुदी, जि. वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain In Maharashtra : केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी घेतला नुकसानीचा आढावा; शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

Scientific Onion Storage: शास्त्रीय पद्धतीने कांदा साठवणूक

Summer Crop Sowing: तीन जिल्ह्यांत २४ हजार८६२ हेक्टरवर पेरणी

Fodder Availability: मुबलक चाऱ्यामुळे पशुपालकांची चिंता मिटली

Agro Input Dealers Association: दोषांची जबाबदारी उत्पादकांवर असावी: ‘ॲग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन

SCROLL FOR NEXT