Pomegranate Market Agrowon
ॲग्रो विशेष

Pomegranate Market : नाशिकमध्ये डाळिंबाची आवक वाढूनही दर टिकून

Pomegranate Rate : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १९ ते २५ ऑक्टोबरदरम्यान डाळिंबाची आवक ४७१८ क्विंटल झाली. मृदुला वाणास ८५० ते २१ हजार ५०० तर सरासरी १८ हजार ५०० रुपये दर मिळाला.

Team Agrowon

Nashik News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १९ ते २५ ऑक्टोबरदरम्यान डाळिंबाची आवक ४७१८ क्विंटल झाली. मृदुला वाणास ८५० ते २१ हजार ५०० तर सरासरी १८ हजार ५०० रुपये दर मिळाला. मागील सप्ताहात आवक २,५५६ क्विंटल होती. तर सरासरी १८,००० रुपये दर होता.

सध्या आवकेत वाढ होऊनही मागणी वाढल्याने दरात क्विंटलमागे ५०० रुपयांची सुधारणा दिसून आली. सप्ताहात भाजीपाल्यासह फळांच्या आवकेनुसार दरात चढ उतार झाल्याचे पाहायला मिळाले. वालपापडी-घेवड्याची आवक ७,२८३ क्विंटल झाली.

वालपापडीला प्रतिक्विंटल ४,५०० ते ८,००० असा तर सरासरी दर ५,३०० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल ३,५०० ते ७,५०० तर सरासरी दर ५,८०० रुपये राहिला. हिरवी मिरचीची आवक २३६ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल ४,५०० ते ७,००० रुपये तर सरासरी दर ५,६०० रुपये मिळाला.

उन्हाळ कांद्याची आवक ५,२२२ क्विंटल झाली. उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल ४,००० ते ५,१५१ तर सरासरी दर ४, ८५० रुपये राहिला. पोळ कांद्याची आवक ७९८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २,२०० ते ४,२०० तर सरासरी दर ३,७०० रुपये राहिला.

बटाट्याची आवक ९,५४४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २,३०० ते ३,००० तर सरासरी दर २,७०० रुपये राहिला. लसणाची आवक ७८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १२ हजार ५०० ते २७ हजार २०० तर सरासरी दर २१,००० रुपये राहिला.

फळभाज्यामध्ये टोमॅटोला ५० ते ३१० तर सरासरी १९०, वांगी ५०० ते ९०० तर सरासरी ६५०, फ्लॉवर १५० ते ३५० सरासरी २५० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. तर कोबीला ११० ते २२० तर सरासरी १७० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले.ढोबळी मिरचीला २५० ते ४०० तर सरासरी दर ३०० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले.

वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा १५० ते ३५० तर सरासरी २५०, गिलके ४०० ते ६०० तर सरासरी ५००, दोडका ४५ ते ६५० तर सरासरी दर ५५० रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. फळांमध्ये केळीला ९०० ते १,८०० तर सरासरी दर १,४०० रुपये मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT