Soybean Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Sowing : भाव नाही, तरी सोयाबीनलाच पसंती

Kharif Sowing : आता केवळ अकरा टक्के क्षेत्रात पेरणी शिल्लक असून यंदाही शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल न करता परंपरागत पिकांनाच पसंती दिली आहे.

Team Agrowon

Amaravati News : जिल्ह्यात आता केवळ अकरा टक्के क्षेत्रात पेरणी शिल्लक असून यंदाही शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल न करता परंपरागत पिकांनाच पसंती दिली आहे. विशेषतः सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल अधिक असल्याचे पेरणी क्षेत्रावरून दिसून आले आहे.

जिल्ह्यात कोरडवाहू शेतीचा पट्टा सर्वाधिक असून खरीप हंगामात सोयाबीन, कापूस व तूर ही मुख्य पिके घेतली जातात. मका, ज्वारीचीही काही भागात पेरणी होत असली तरी त्याचे प्रमाण अल्प आहे. तर मूग व उडीद या पिकांच्या पेरणीला शेतकऱ्यांनी नापसंती दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून या पिकांची पेरणी सातत्याने कमी झाली आहे. यंदाही फार कमी क्षेत्रात मूग व उडदाची पेरणी करण्यात आली आहे.

जूनमध्ये पेरणीला प्रारंभ होत असला तरी यंदा मॉन्सून विलंबाने आला व तोही विखुरलेल्या स्वरूपात झाल्याने पेरण्यांना उशीर झाला. १५ जुलैपर्यंत जिल्ह्यात पेरणी करण्यात येत असून जुलैमधील दमदार पावसाने पेरणीची गती वाढून ती ८९ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

सरासरी ६ लाख ८१ हजार १७७ हेक्टरपैकी ६ लाख १ हजार ९५१ हेक्टर क्षेत्रातील पेरणी आटोपली आहे. यापैकी सोयाबीनखाली २ लाख ३२ हजार, कापसाखाली २ लाख ५ हजार व तुरीखाली १ लाख २ हजार ४४४ हेक्टर क्षेत्र आले आहे. तर १५ हजार ४१९ हेक्टरमध्ये मक्याची पेरणी झाली आहे. मुगाखाली ११७३ व उडदाखाली ६७५ हेक्टर क्षेत्र आहे.

तुरीचे क्षेत्र घटले

खुल्या बाजारात सोयाबीनचे दर पडले असतानाही शेतकऱ्यांनी पीकपद्धतीत बदल न करता सोयाबीनला पहिली पसंती कायम ठेवली आहे. सरासरी क्षेत्राच्या ३४ टक्के भागांत सोयाबीनची पेरणी झाली आहे. तर कापसाखाली ३० टक्के क्षेत्र व्यापले आहे. तुरीला उच्चांकी दर असताना १५ टक्के क्षेत्रांत पेरणी झाली आहे.

सोयाबीनला लागणारा लागवड खर्च व पीक येण्यासाठी लागणारा कालावधी याचा ताळमेळ साधत शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिली आहे.

पीकनिहाय पेरणी (हेक्टर)

सोयाबीन ः २,३२,२८६, कापूस ः २,०५,८२३, तूर ः १,०२,४४४, मका ः १५,४१९, मूग ः ११७३, उडीद ः ६७५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT