Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : अमरावती जिल्ह्यात खरीप पेरा ८२ टक्के क्षेत्रावर

Kharif Season : सोयाबीन, कापूस व तूर ही खरीप हंगामातील मुख्य पिके असून, पावसाला विलंब होत असल्याने पेरण्या रखडल्या होत्या.

Team Agrowon

Amaravati News : जून महिन्यात पावसाची २७ टक्के तूट राहिली असली तरी यादरम्यान झालेल्या हलक्या व मध्यम पावसाच्या भरवशावर जिल्ह्यात ८२ टक्के क्षेत्रावरील खरिपाची पेरणी आटोपली आहे. सरासरी क्षेत्रापैकी ५.६२ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीखाली आले आहे.

सोयाबीन, कापूस व तूर ही खरीप हंगामातील मुख्य पिके असून, पावसाला विलंब होत असल्याने पेरण्या रखडल्या होत्या. जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी ११६.३ मिलिमीटर पाऊस झाला असून सरासरीच्या तुलनेत त्याचे प्रमाण ७३ टक्के इतके आहे.

यामुळे अपेक्षित पर्जन्यमानापेक्षा २७ टक्के तूट आहे. दरम्यान जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरूपात हलका व मध्यम पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांना गती दिली. २६ जूनपर्यंत पेरणीखाली आलेले ५० टक्के क्षेत्र दोन जुलैला ८२ टक्क्यांवर पोहोचले.

जुलैमध्ये सरासरीपेक्षा १०६ टक्के अधिक पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पेरणी झालेल्या खरीप पिकांमध्ये सोयाबीनखाली अधिक क्षेत्र आले असून, दोन लाख १३ हजार ६०४ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे.

तर पऱ्हाटीची १ लाख ९८ हजार २९८ व तुरीखाली ९५ हजार ३६० क्षेत्र आले आहे. यंदाही सोयाबीनचे क्षेत्र तुलनेने वाढले आहे.

जिल्ह्यातील पेरणीची स्थिती (हेक्टरमध्ये)

एकूण क्षेत्र ६,८२,९९२

प्रत्यक्ष पेरणी ५,६२,६८४

टक्केवारी ८२.३८

सोयाबीन २,१३,६०४

कापूस १,९८,२९८

तूर ९५,३६०

मूग ६५९

उडीद ३०८

ज्वारी ३७३४

मका ३९,७४८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT