Desi Cow Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

Desi Cow : शेती, आरोग्यासाठी देशी गोवंश संवर्धनावर लक्ष द्या

Indigenous Cow : गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांकडील जातिवंत देशी गोवंश कमी झाला आहे. जमिनीची सुपीकता, अन्नधान्य गुणवत्ता ढासळली आहे. त्याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे.

Mahesh Gaikwad

Dapoli News : गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांकडील जातिवंत देशी गोवंश कमी झाला आहे. जमिनीची सुपीकता, अन्नधान्य गुणवत्ता ढासळली आहे. त्याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. हे लक्षात घेऊन सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून शाश्वत शेती, दर्जेदार अन्नधान्य उत्पादनासाठी स्थानिक देशी गोवंशाची जोड शेती आणि मानवी आरोग्य व्यवस्थापनासाठी द्यावी, असा सल्ला अहमदाबाद येथील बन्सी गीर गोशाळेचे संस्थापक गोपालभाई सुतारिया यांनी दिला.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये मंगळवारी (ता.२२) राज्य गोमाता दिनानिमित्त कोकण कपिला गोवंश संवर्धन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोपालभाई सुतारिया, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय भावे, संशोधन संचालक डॉ.प्रशांत शहारे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.डी.एस.सोनावले, पशुसंवर्धन विभागाचे माजी प्रमुख डॉ.बी.जी.देसाई, सिद्धेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

गोपालभाई सुतारिया म्हणाले, की देशामध्ये प्रदेशनिहाय देशी गोवंश विकसित झाले आहेत. सर्व गोवंश चांगल्या गुणवत्तेचे असल्यामुळे पशुपालकांनी स्थानिक भागातील गोवंशाला संवर्धनासाठी प्राधान्य द्यावे. सेंद्रिय खत, कीडनाशकांच्या उपलब्धतेसाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे जातिवंत गोवंश होता.

काळाप्रमाणे देशी गोपालन मागे पडले, त्याचा परिणाम जमीन सुपीकता, मानवी आरोग्यावर झाला आहे. हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी शाश्वत शेतीला देशी गोवंशाची जोड द्यावी. कुलगुरू डॉ. भावे म्हणाले, की विद्यापीठाच्या माध्यमातून कोकण कपिला गोवंश संवर्धन, जातिवंत पैदास, आहार व्यवस्थापनातून संवर्धनाला चालना दिली आहे. शेतीला पशुपालनाची जोड देऊन किफायतशीर शेती तंत्रज्ञान पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.

डॉ. बी. जी. देसाई यांनी कोकण कपिला गोवंशाची वैशिष्टे, गुणधर्म आणि येत्या काळात गोवंश पैदास धोरण कसे असावे याबाबत मार्गदर्शन केले. संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. नरेंद्र प्रसादे यांनी विद्यापीठाच्या माध्यमातून गोवंश संवर्धन आणि संशोधनाचा आढावा घेतला.

डॉ. डी. एस. सोनावले यांनी पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती दिली. प्रास्ताविक विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. संतोष वरवडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मंदार पुरी आणि आभार प्रदर्शन डॉ.प्रवीण झगडे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरी शक्य

CM Women Employment Scheme: बिहार सरकारच्या ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेतून महिलांना मिळणार १० हजार रुपये

Crop Insurance : पीकविम्याची थकित १६० कोटी भरपाई वाटप करा

Cashew Crop Insurance : विमा परताव्याची रत्नागिरीत ३६ हजार बागायतदारांना प्रतीक्षा

Illegal Fishing : अवैध मासेमारीला चालना मिळणार

SCROLL FOR NEXT