Indigenous Cow Center Pune
Indigenous Cow Center PuneAgrowon

Desi Cow Research: देशी गाय संशोधन, प्रशिक्षण केंद्रातून दिशादर्शक काम : तुषार पवार

Sustainable Livestock Development: देशी गाय संशोधन, प्रशिक्षण आणि नवोपक्रमासाठी पुणे कृषी विद्यापीठात उभारले गेलेले केंद्र शाश्वत पशुधन विकासाचे नवे मॉडेल ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती तुषार पवार यांनी कार्यशाळेत दिली.
Published on

Pune News: पशुशास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांच्या कल्पनांच्या एकत्रित प्रयत्नातून देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे काम वेगाने होणार आहे. हा प्रकल्प देशी गाय संशोधन, नवोपक्रम आणि शाश्वततेचे भविष्य घडवणारा आहे. हे काम आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्यात येतील, असे मत महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार यांनी व्यक्त केले.

पुणे कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने ‘पशुधन संशोधन आणि नवोपक्रमाची प्रगती’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

Indigenous Cow Center Pune
Desi Cow Breed : खामगाव गोवंश ः विदर्भातील वातावरणास अनुकूल

कार्यशाळेचे उद्घाटन तुषार पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कृषी महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुभाष भालेकर अध्यक्षस्थानी होते. कार्यशाळेमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातील निवृत्त विभाग प्रमुख, प्राध्यापक तसेच कार्यरत शास्त्रज्ञ आणि कर्मचारी उपस्थित होते.d

Indigenous Cow Center Pune
Livestock Development : विदर्भात निर्माण व्हावे ‘काऊ फार्म्स’!

या केंद्रांतर्गत भारतीय गोवंशाचे संवर्धन-वारसा, अनुवंशशास्त्र आणि शाश्वतता, दूध, शेण आणि गोमूत्र मूल्यवर्धन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आयओटी-सक्षम पशुधन शेती, हवामान-आधारित गोठा प्रणाली, आयव्हीएफ/ईटी कार्यक्रम, अवशेषमुक्त दूध उत्पादन आणि गो पर्यटन या विषयांमध्ये सक्रियपणे काम पुढील दिशा ठरविणे हे या कार्यशाळेचे उद्दिष्ट होते.

या वेळी आयोजित तांत्रिक सत्रामध्ये देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी प्रकल्पामध्ये मागील पाच वर्षांमध्ये केलेल्या संशोधनाचे सादरीकरण केले. तसेच राज्यस्तरावर दिलेल्या शिफारशींची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शैलेंद्र कांबळे यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ. धीरज कंखरे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com