Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Ajit Pawar Audit: उपमुख्यमंत्री पवार ॲक्शन मोडवर

Baramati Rain: गेल्या दोन दिवसांत बारामती परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेपासून थेट पाहणी दौऱ्यास सुरुवात करत प्रशासनाला तातडीचे आदेश दिले आहेत.

Team Agrowon

Pune News : गेल्या दोन दिवसांत बारामती तालुका व शहरात झालेल्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता. २६) पहाटेपासूनच बारामती शहर आणि तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरू केली आहे. नुकसानीची माहिती मिळतात रविवारी (ता. २५) रात्रीच अजित पवार बारामतीत दाखल झाले आहेत. 

अजित पवार यांनी नागरिकांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. त्याचबरोबर अधिकाऱ्यांना तातडीने महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. बारामती एमआयडीसीमधील तीन इमारतींना धोका पोहोचण्याची शक्यता आहे, ही बाब विचारात घेऊन बारामती नगरपालिकेने या तिन्ही इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे.

त्यानंतरच नागरिकांना या इमारतीत राहणे शक्य आहे का या बाबतचा निर्णय घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. नीरा डावा कालवा ज्या ठिकाणी फुटला त्या परिसरासही अजित पवार यांनी भेट दिली. दरम्यान झालेल्या सर्व नुकसानीची एकत्रित माहिती गोळा करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. खांडज, सांगवी, लाटे या परिसराचीही ते पाहणी करणार आहेत.

अजित पवार यांच्या समवेत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, तहसीलदार गणेश शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्यासह प्रशासन सर्वच वरिष्ठ अधिकारी या दौऱ्यात उपस्थित आहेत.

अजित पवार यांनी दिलेल्या सूचना

 अरुंद ओढ्यांचे रुंदीकरण करणे. 

 चाऱ्या, पोटचाऱ्यांची स्वच्छता करा. 

 जिथे लोकांना मदतीची गरज आहे तेथे तातडीने मदत उपलब्ध करून देणे.

 पिकांचे, घरांचे जे नुकसान झाले आहे त्याचे तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल सादर करणे. 

 जिथे पाणी साचून राहते आहे, अशा ठिकाणांची माहिती घेऊन पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Egg Rate: अंडीदर कोसळल्याने पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत

Agrowon Exhibition 2026: शेतकऱ्यांची मांदियाळी एकवटली!

Onion Rate: कांद्याला १८०० रुपयांपर्यंत प्रति क्विंटल दर

Vidarbha Irriagation Project: विदर्भातील सिंचन प्रकल्प निधीच्या दुष्काळामुळे कोरडे

Winter Weather Forecast: तापमानात चढ-उतार शक्य; गारठा कायम

SCROLL FOR NEXT