Water Conservation: जलसंधारणाच्या कामांना तत्काळ मान्यता द्या: जितेंद्र डुडी

Collector Jitendra Dudi: पुणे जिल्ह्यातील जलसंधारण कार्यांना अधिक गती देण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेसाठी तत्काळ प्रशासकीय मान्यता देण्याचे आदेश दिले आहेत.
Collector Jitendra Dudi
Collector Jitendra DudiAgrowon
Published on
Updated on

Pune News: ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार,’ ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’ अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या ६८ लाख ६६ हजार घन मीटर गाळ काढण्याच्या २२० कामांना प्रशासकीय मान्यता तत्काळ द्यावी. जसजसे प्रस्ताव प्राप्त होतील त्या गतीने प्रशासकीय मान्यता द्यावी. यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अशासकीय संस्थांची यंत्रणा ज्या तालुक्यात अधिक आहे अशा ठिकाणी त्यांना कामे द्यावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनांबाबत आढावा बैठकीत ते मंगळवारी (ता.१७) बोलत होते. या वेळी पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुजाता हांडे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक दिवाकर धोटे आदी उपस्थित होते.

Collector Jitendra Dudi
Water Conservation : जलसाक्षरता वाढविण्यासाठी ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ साजरा होणार

श्री. डुडी म्हणाले, की जलयुक्त शिवार अभियानाच्या अनुषंगाने शिवारफेरीचे काम १५ मेपर्यंत पूर्ण करावे. यात ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदींना सहभागी करून घ्यावे. जी नवीन, दुरुस्तीची कामे या योजनेत समाविष्ट करणे आवश्यक असल्याचे आढळून आले, त्यांच्याबाबत सविस्तर नोंदी घेऊन अंदाजपत्रके तयार करावीत. शिवारफेरीमध्ये प्रत्यक्ष गावात भेटी देऊन नोंद असलेल्या अस्तित्वातील मृद्‍ व जलसंधारण संरचनांची स्थळ पडताळणी करण्यासह नोंद नसलेल्या मात्र नव्याने आढळलेल्या संरचनांची नोंद घेण्यात येणार आहे.

पडताळणी व नोंद केल्यानंतर सद्यःस्थिती व उपयुक्ततेबाबत माहिती मोबाइल ॲपमध्ये अचूकपणे भरण्याचे काम करावे. लघुसिंचन योजनांची ७ वी प्रगणनाही शिवारफेरीच्या वेळीच करून घ्यावी. अटल भूजल योजनेअंतर्गत नळपाणी पुरवठा योजनांच्या स्रोतांचे बळकटीकरणाची कामे हाती घ्यावीत.

Collector Jitendra Dudi
Water Conservation: पुणेकरांनी घेतली जलसाक्षरतेची शपथ

५४५५ कामांच्या आराखड्यास मान्यता

जलयुक्त शिवार अभियान २.० मध्ये सर्व विभागांच्या मिळून ५६ कोटी ३७ लाख रुपयांच्या एकूण ५ हजार ४५५ कामांना आराखड्यास मान्यता देण्यात आली. लेखाशीर्षांतर्गत हाती घेतलेल्या ७९५ पैकी ७४३ कामे पूर्ण झाली असून उर्वरित प्रगतीत आहेत. अभिसरणातील ४ हजार ५५३ कामे पूर्ण झाली असून ५२ कामे सुरू आहेत. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या १०० दिवस कृती कार्यक्रमादरम्यान या अभियानांतर्गत ५३१ कामांपैकी ३८७ पूर्ण झाली असून उर्वरित सुरू आहेत.

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, व नाला खोलीकरण’अंतर्गत ४७ कोटी ७७ लाख रुपयांच्या १९६ कामांना मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी १३४ कामे पूर्ण झाली असून २९ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. यामध्ये १०० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत हाती घेतलेल्या १३८ पैकी १०० कामे पूर्ण झाली असून २० प्रगतिपथावर आहेत. अमृत सरोवर योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- पाणलोट विकास घटक २.० जलशक्ती अभियान- कॅच द रेन (जल संचय जन भागीदारी) आदींचाही आढावा घेण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com