Ajit Pawar On Baramti Watar issue Agrowon
ॲग्रो विशेष

Ajit Pawar : 'बारामतीच्या पाण्यासाठी, नियम पाळला नाही', अजित पवारांचे मोठं वक्तव्य

Ajit Pawar On Baramti Watar issue : राज्यात विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरू झाला असून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या पाण्यावरून वक्तव्य केलं आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून विविध मतदार संघात प्रचार सुरू झाला आहे. तर सोमवारी (ता. ४) अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. यादरम्यान राज्यात अनेक ठिकाणी लक्ष्यवेधी लढत होणार असून बारामतीत काका विरोधात पुतण्या अशी लढत होणार आहे. येथे अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या थेट लढत होणार आहे. यादरम्यान अजित पवार यांनी बारामतीच्या पाण्यावरून भाष्य करताना, बारामतीच्या पाण्यासाठी नियम पाळला नाही, असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याची आता बारामतीसह जिल्ह्यात चर्चा होत आहे.

बारामतीत युगेंद्र पवार यांच्यासह अजित पवार प्रचाराला लागले आहेत. युगेंद्र पवार यांच्याबरोबर जेष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. तर अजित पवार यांच्यासाठी खासदार सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते प्रचार करत आहेत. दरम्यान दिवाळी पाडव्या दिवशी अजित पवार यांनी तालुक्यातील कटफळ येथे प्रचार दौरा केला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी अजित पवार यांनी, आपण पाण्यासाठी नियम डावलले आणि बारामतीकरांना पाणी दिल्याचे म्हटलं आहे.

बारामती तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर असून गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. मात्र पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागू नये यासाठी नियमात बसत नसतानाही पाणी दिलं. पाणी सोडण्यासाठी अधिकाऱ्यांना भाग पाडलं, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. असे करण्यासाठी नेतृत्वात धमक असावी लागते.

बारामतीकरांच्या पाण्यासाठी अधिकाऱ्यांना, मला माझ्या लोकांसाठी पाणी हवं आहे. माझ्या लोकांचे नुकसान होत असल्याचे सांगितले होते. तर अधिकाऱ्यांना पाणी सोडण्यास भाग पाडले. मी असं काम करतो, असे अजित पवार यांनी म्हटले. यावेळी लोकसभेला जर सुप्रिया पडली असती तर साहेबांना 'या' वयात त्रास झाला असता. यामुळे तुम्ही सुप्रियाला मतदान केले. आता विधानसभेला मला मतदान करा, मला पण खुश करा. साहेब त्यांच्या पद्धतीने काम करतील. मी माझ्या पद्धतीने मतदारसंघाचा विकास करतो, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT