Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win Agrowon
ॲग्रो विशेष

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचे अनेक उमेदवार विजयाच्या जवळ पोहचले आहेत.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येत असून महायुतीचे अनेक उमेदवार विजयाच्या समिप पोहचले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कृषिमंत्री धनंजय मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरे विजयी झाले आहेत.

महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघ आणि १३ राज्यांमधील पोटनिवडणुकांचे निकाल आज लागणार आहे. सध्या मतमोजणी सुरू असून राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. महाराष्ट्रात महायुतीची लाट आली असून भाजपाने १२७ जागांवर आघाडी घेतली आहे. शिवसेना (शिंदे) ५६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ३८ जागांवर आघाडी कायम ठेवून आहे.

फडणवीस यांचा विजय

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजय झाला असून सध्या नागपुरमध्ये जल्लोष केला जात आहे. तसेच भाजपने यंदा १२७ जागांवर विजय मिळवला आहे. यामुळे भाजप नेते सागर बंगल्यावर जमण्यास सुरुवात झाली आहे.

कोकणात राणे केसरकर विजय

कोकणात नारायण राणे यांचे पूत्र नितेश राणे यांचा देखील विजय झाला असून कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला आहे. सावंतवाडीत दिपक केसरकर यांनी विजयी मिळवला असून त्यांनी ठाकरे गटाचे राजन तेली यांचा पराभव केला आहे.

विखे पाटील विजयाच्या उंबरठ्यावर

राधाकृष्ण विखे पाटील विजयाच्या उंबरठ्यावर पोहचले असून कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे. यावेळी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी करत विखे पाटील यांची गळाभेट घेतली.

परळीत मुंडेंच्या घडाळ्याची टीक टीक

बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघात अतितटीची ठरलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे धनंजय मुंडे यांनी अखेर विजय मिळवला. ते ५० हजार ५३१ मतांनी लीडवर असून ही निर्णायक आघाडी मानली जात आहे.

तटकरेंची ७७ हजार ४६० मतांची आघाडी

श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आदिती तटकरे या विजयाच्या जवळ पोहचच्या असून त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार अनिल नवगणे यांचा पराभव केल्यात जमा आहे. येथे राजेंद्र ठाकूर हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असल्याने मोठी चूरस निर्माण झाली होती.

आदिती तटकरे या सध्या १ लाख ८ हजार ०२९ मतांवर असून त्यांनी ७७ हजार ४६० मतांची आघाडी घेतली आहे. अनिल नवगणे यांना फक्त ३० हजार ५६९ मते मिळाली आहेत. २०१९ च्या निवडणुकीत तटकरे यांनी शिवसेनेचे उमेदवार विनोद घोसाळकर यांचा तब्बल २९ हजार ६२१ मतांनी पराभव केला होता.

महाजन सातव्यांदा आमदार

राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा देखील विजय झाला असून त्यांनी याआधीच विजयी षटकार ठोकला आहे. आता सातव्यांदा ते जामनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात आहेत. आठव्या फेरीनंतर महाजन यांनी ९५११ मतांनी आघाडी. महाजन यांना ४२५९४ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचेदिलीप खोडपे यांना ३३०८३ मते मिळाली आहेत.

आठव्या फेरीतच राणे विजयी

कणकवली विधानसभा मतदारसंघात देखील भाजपला यश मिळाले असून नितेश राणे विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे संदेश पारकर असा सामना नितेश राणे यांनी जिंकला. आठव्या फेरीच्या मतमोजणी वेळीच नितेश राणे २० हजारपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर होते. त्यावेळी कणकवलीत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत गुलाल उधळला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT