Kolhapur Assembly Constituency Result 2024 : कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेने महाविकास आघाडीला सपशेल नाकारत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला स्पष्ट बहुमत दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १० पैकी ९ जागांवर वर्चस्व मिळवत सतेज पाटील यांचा वारू रोखण्यात महाडिक, कोरे, आवाडे, मुश्रीफ, यड्रावकर यांना यश आले आहे.
जिल्ह्यातील सर्वात काटाजोड लढत ठरलेल्या कोल्हापूर दक्षिणमध्ये सतेज पाटील यांना तगडा झटका बसला असून पुतणे ऋतुराज पाटील यांना अमल महाडिक यांनी पराभूत केले आहे. तर शाहू आघाडीचे शिरोळ तालुक्यातील राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांचा ४१ हजार १९६ मतांनी विजय झाला आहे. याचबरोबर हसन मुश्रीफ यांच्या अस्तित्वाची लढाई ठरलेल्या अत्यंत चुरशीमध्ये हसन मुश्रीफ यांनी विजय खेचून आणला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून सतेज पाटील यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. दरम्यान त्यांनी आपलं राजकीय वजन वापरत काँग्रेससाठी ५ जागा आणल्या होत्या परंतु त्यांना एकाही जागेवर विजय खेचून आणण्यात यश आले नाही.
शिरोळ विधानसभा मतदारसंघातून आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर) हे ४१ हजार १९६ मताधिक्याने विजय झाले आहे. साडेबाराच्या सुमारास शिरोळ मधील ३०७ मतदान केंद्रावरील १२ टेबलवर २२ फेऱ्यात मत मोजणी झाली. यात महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. तर स्वाभिमानीचे उमेदवार उल्हास पाटील यांना जोराचा धक्का बसला असून त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. शिवाय जिल्ह्यात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे लीड सर्वाधिक आहे.
खासदार धनंजय महाडिक यांच्या वक्तव्यावरून राज्यात चर्चा
कोल्हापूर दक्षिणची लढाई खासदार धनंजय महाडिक यांनी लाडक्या बहिणींवरून केलेल्या वक्तव्यावरून राज्य पातळीवरती गेली होती. त्यामुळे कोल्हापूर दक्षिणच्या हाय व्होल्टेज लढाईमध्ये कोण बाजी मारणार? याकडे फक्त जिल्ह्याचे नव्हे, तर राज्याचे लक्ष लागून राहिले होते. त्यामुळे सतेज पाटील यांची सुद्धा प्रतिष्ठा या मतदारसंघांमध्ये पणाला लागली होती. मात्र सीएम योगी यांची झालेली सभा, लाडकी बहीण योजना कोल्हापूर दक्षिणच्या निकालामध्ये महत्त्वपूर्ण ठरल्याचे दिसून येत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.