Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या निकालात सकाळपासूनच महायुतीने मुसंडी मारली आहे. दुपारी १२ वाजून ३० मिनिटापर्यंतच्या कलानुसार राज्यात २८८ जागांपैकी महायुतीने २१६ जागांवर आघाडी घेतली आहे.
Maharashtra Vidhansabha
Maharashtra VidhansabhaAgrowon
Published on
Updated on

Vadala Vidhandsabha Live Update : राज्यातील एका मतदारसंघाचा निवडणूक आयोगाकडून अधिकृत निकाल जाहीर केला आहे. भाजपचे वडाला मतदारसंघाचे उमेदवार कालीदास कोळंबकर यांनी २४ हजार ९७३ मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाच्या श्रद्धा जाधव रिंगणात होत्या. कोलंबकर यांना एकूण ६६ हजार ८०० मतं मिळाली. तर श्रद्धा जाधव यांना ४१ हजार ८२७ मत मिळाली. कोलंबकर १९९० पासून आमदार आहेत. एकूण ८ वेळा ते आमदार राहिले. आता त्यांनी ९ व्या वेळी निवडणुकीच्या मैदानात बाजी मारली आहे.

Maharashtra Vidhansabha
Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

विधानसभा निवडणुकीच्या निकालात सकाळपासूनच महायुतीने मुसंडी मारली आहे. दुपारी १२ वाजून ३० मिनिटापर्यंतच्या कलानुसार राज्यात २८८ जागांपैकी महायुतीने २१६ जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास ५२ जागांवर आघाडीवर आहे. तसेच इतरने २० जागांवर आघाडी घेतली आहे. पक्षीय बलाबल पाहता भाजपने १२४, शिंदे शिवसेना ५५ आणि अजित पवार राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष ३८ जागांवर आघाडीवर आहे. महाविकास आघाडीमध्ये कॉँग्रेस १९, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना १९ आणि शरद पवार राष्ट्रवादी कॉँग्रेस १३ जागांवर आघाडीवर आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीत चुरशी लढत होईल, असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत होते. परंतु निवडणुकीचे निकाल एकतर्फी महायुतीच्या बाजूने झुकल्याचे दिसत आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना, लाडकी बहिण, लाडकी शेतकरी, लाडके भाऊ आणि लाडके वृद्ध यांनी महायुतीला मत दिले याबद्दल आभार व्यक्त केले. दरम्यान आता महायुतीचा मुख्यमंत्री नेमका कोण होणार, याबद्दल चर्चेला पेव फुटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com