Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Ajit Pawar : 'जानाई' च्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण ; उपमुख्यमंत्र्यांचं ३० जानेवारीला बैठकीचं आश्वासन

Janai Irrigation Scheme : जनाई उपसा जलसिंचन योजनेचे हक्काचे पाणी पूर्ण क्षमतेने मिळावे, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष कृती समितीने आमरण उपोषण सुरू केले आहे.

Team Agrowon

Baramati News : जनाई उपसा जलसिंचन योजनेचे हक्काचे पाणी पूर्ण क्षमतेने मिळावे, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष कृती समितीने आमरण उपोषण सुरू केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या उपोषणाची दखल घेत आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.

यावेळी ३० जानेवारीला जलसंपदा विभागाचे अधिकारी कृती समितीच्या शिष्टमंडळाची बैठक घेण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.

जानाई उपसा जलसिंचन योजनेच्या लाभधारक शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे, यासाठी २६ जानेवारीपासून आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या प्रकरणी पवार यांनी आश्वासन दिल्यानंतरही बैठकीपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा कृतू समितीने घेतला आहे.

पवार यांनी उपोषणस्थळी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या १२ मागण्यांपैकी बहुतांश मागण्या मार्गी लावल्या. तर हक्काच्या २.१७ टीएमसी पाणी शेतकऱ्यांना मिळावे. तसेच तीन आवर्तनामध्ये शेतीसाठी पाणी देण्याविषयी यावेळी चर्चा झाली.

दरम्यान, अधिकारी नसल्याने मला त्याबाबात सांगता येणार नसल्याने आपण कृती समित्याच्या १० जणांचे शिष्टमंडळाची अधिकाऱ्यांसह मंत्रालयात बैठक घेवू, असे आश्वासन पवार यांनी शेतकऱ्यांना दिले.

३० जानेवारील तुम्ही मुंबईत या. टेलला असणाऱ्या शेतकऱ्याला पणई मिळत नसेल तर तुम्हाला बंद पाईपलाईनमधून पाणी देवू. तसेच कालवा सल्लागार समितीवर तीन सदस्य घेतले जातील, असेही पवार यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fruit Processing Industry Development: फळप्रक्रिया उद्योगांसाठी लवकरच नवीन योजना : केंद्रीय कृषी सचिव आतिश चंद्रा

Soybean Farming: खेडच्या पूर्व भागामध्ये सोयाबीनला नवसंजीवनी

Kharif Season Crisis: पिके तहानली; उपसाबंदीने शेतकऱ्यांची कोंडी

Agriculture Department Staffing Plan: कृषी विभागाचा आकृतिबंध अखेर रद्द

Flower Farmers Struggle: फुलबाजारातील शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण थांबवा

SCROLL FOR NEXT