Ajit Pawar : उपमुख्यमंत्री पवार यांनी केले माळेगावकरांचे अभिनंदन

CM Saksham City Competition 2023 : ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा -२०२३’ यात माळेगावने मिळविलेल्या यशाबद्दल मुख्याधिकारी, स्थानिक नेतृत्व व शहरवासीयांचे अभिनंदन करतो,’’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशंसा केली.
Ajit Pawar
Ajit Pawar Agrowon

Malegaon News : ‘‘माळेगाव नगरपंचायत प्रशासनाने नगरविकास क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. बारामती शहराचा आदर्श ठेवून माळेगावने प्रगत व उपक्रमशील नगरपंचायत बनण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे.

‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा -२०२३’ यात माळेगावने मिळविलेल्या यशाबद्दल मुख्याधिकारी, स्थानिक नेतृत्व व शहरवासीयांचे अभिनंदन करतो,’’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशंसा केली.

Ajit Pawar
Ajit Pawar : मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता, कामाला लागा

‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा २०२३’ मध्ये पुणे विभागात नगरपंचायत वर्गामध्ये माळेगाव (ता. बारामती) नगरपंचायतीने पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळविला. तसेच गतवर्षी माझी वसुंधरा अभियानात माळेगाव नगरपंचायतीने राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. त्या पार्श्‍वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार यांनी माळेगावच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांचा सन्मान केला.

Ajit Pawar
Ajit Pawar : 'काढा पद यात्रा! आता उत्साह आलाय?', अजित पवार यांची कोल्हे यांच्यावर टीकास्त्र, म्हणाले, पाडणार म्हणजे पाडणार!

सुंदर माळेगाव होण्यासाठी निधी मिळणार...

मुख्याधिकारी स्मिता काळे म्हणाल्या, की यापुढील काळात माळेगाव शहर अधिक स्वच्छ, सुंदर व सक्षम बनवण्याचा प्रयत्न शासनस्तरावर होणार आहे.

त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुरेसा निधी शासनस्तरावर उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे माळेगाव नगरपंचायतीकडून शहरविकासासाठी घेण्यात आलेल्या प्रत्येक निर्णयामध्ये गावकऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com