Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : कृषी विभागाची भरारी पथके सज्ज

Kharif Season : यंदाच्या खरीप हंगामात बियाणे बाजार एक जूननंतर सुरू होणार असून, या बाजारात बोगस व नकली बियाण्यांच्या विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी कृषी विभागाने तयारी केली आहे.

Team Agrowon

Kharif Season In Amravati : यंदाच्या खरीप हंगामात बियाणे बाजार एक जूननंतर सुरू होणार असून, या बाजारात बोगस व नकली बियाण्यांच्या विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी कृषी विभागाने तयारी केली आहे.

शेतकऱ्यांची बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करताना फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभागाचे लक्ष्यांक निश्चित झाले आहे. १५ भरारी पथके स्थापन करण्यात आली असून, तेवढीच तक्रार नियंत्रण कक्ष उभारण्यात आली आहेत.

खरीप हंगाम कृषी निविष्ठा गुणनियंत्रण नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी पंधरा भरारी पथक स्थापन करण्यात आले आहेत. निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्ष व तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती गठित करण्यात आल्या आहेत.

कापूस बियाण्यांसाठी एक जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती आहे. या पथकांचे काम सुरू झाले असून ३० मे पर्यंत कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी व उपलब्धतता तपासण्यात येणार आहे. २५ मे रोजी नमूने काढण्यात येणार आहेत.

यावर्षी बियाण्यांचे १४४०, खतांचे ७७६ व कीटकनाशकांचे २६३ अशा एकूण २४७९ कृषी निविष्ठांच्या नमुन्याचे लक्ष्यांक निश्चित करण्यात आले आहे. गतवर्षी या विभागाने २१ परवाने निलंबित केले आहेत. गतवर्षीच्या हंगामात बियाण्यांचे १५१८ लक्ष्यांक ठरविण्यात आले होते.

त्यापैकी १३३७ नमुने काढण्यात आले होते. त्यातील ९४ प्रकरणांत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून एका प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आला आहे. चार विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले.

खतांचे १० व कीटकनाशकांचे ७ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. गतवर्षीचा अनुभव लक्षात घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने यावर्षी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT