Free Seed Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Free Seed Scheme : मोफत बियाणे नको रे बाबा!

Seed Distribution : महाडीबीटी पोर्टलवर विविध योजना प्रथम नोंदणी करणाऱ्यांना प्रथम प्राधान्य या अटीखाली शेतकऱ्यांना लाभ घेता येतो. मोफत बियाणे व खते योजनेतून सध्या बियाणे वाटप सुरू आहे.

Team Agrowon

Palghar News : जिल्ह्यात पावसाला चांगली सुरुवात झाल्याने शेतकरीवर्ग शेतीच्या कामाला लागला आहे. शेतीशी निगडित महाडीबीटी पोर्टलवर विविध योजना कार्यान्वित आहेत. मात्र या पोर्टलवर शेतकरी नोंदणीसाठी अर्जाला प्रत्येकी २३ रुपये शुल्क येत आहे. यामुळे शेतकऱ्यांवर हा अधिकचा भार असल्याचे येथील आदिवासी बोलत आहेत.

महाडीबीटी पोर्टलवर विविध योजना प्रथम नोंदणी करणाऱ्यांना प्रथम प्राधान्य या अटीखाली शेतकऱ्यांना लाभ घेता येतो. मोफत बियाणे व खते योजनेतून सध्या बियाणे वाटप सुरू आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविले जात आहेत; परंतु याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला ऑनलाइन प्रणालीत २३.६० पैसे इतके शुल्क भरावे लागत आहे.

हा अर्ज भरताना शेतकऱ्यांना पोर्टल वापरण्याचे २० रुपये शुल्क तसेच राज्य व केंद्र शासनाचा प्रत्येकी नऊ टक्के जीएसटी भरावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकूण २३.६० रुपये शुल्क भरावे लागत आहे. त्यासाठी पोर्टलवर पेमेंट करण्याचे सर्व पर्याय उपलब्ध आहेत. पण अर्ज केल्यानंतर तो कृषी विभागाकडून नामंजूर झाला तर पुन्हा नोंदणीची प्रक्रिया शेतकऱ्यांना करावी लागते. याचा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

ऑनलाइन आयडी बंधनकारक

शेतकऱ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी शेतकरी आयडी काढणे बंधनकारक केले आहे. परंतु येथील शेतकरी मोबाईल वापरत असले तरीही महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने आयडी काढणे अनेकांना येत नाही.

अशावेळी महा ई-सेवा केंद्रात जाण्याशिवाय पर्याय राहात नाही. काही शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने आयडी काढला तरी योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.\

मोफत बियाण्यांसाठी ससेहोलपट

पोर्टलचा सर्व्हर अधूनमधून बंद पडत असल्याने शेतकऱ्यांची मोफत बियाण्यांसाठी ससेहोलपट होत आहे. अर्ज मंजूर झाल्याशिवाय शुल्क भरू नये, अशी तरतूद या पोर्टलवर हवी, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. तर अर्ज नामंजूर झाल्यावरही भरलेले शुल्क परत मिळणार नाही, असे पावतीवर लिहिले असल्याने ‘मोफत बियाणे नको रे बाबा’ म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

महाडीबीटी पोर्टलवरील त्रुटी शेतकऱ्यांशी चर्चा करून दूर करणे आवश्यक आहे. तसेच सर्व्हर डाऊन होणे, दोनपेक्षा अधिक वेळा शुल्क भरण्याची प्रक्रिया बंद करायला हवी. एकदा शुल्क भरले की अर्ज मंजूर होईपर्यंत हेच वापरायला हवे. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर तोडगा काढणे आवश्यक आहे.
- रवींद्र गवते, शेतकरी
गावागावात शेतकऱ्यांचा गट तयार करून महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करता येते. यामुळे एकाच गटाच्या नावाने शुल्क भरण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांची नोंदणी पोर्टलवर होताना समस्या होत असेल तर याकरिता कार्यालयात ऑफलाइन सुविधा आहे.
- जयराम आढळ, तालुका कृषी अधिकारी, जव्हार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

Lumpy Skin : लातूर जिल्ह्यात बारा गावांत ‘लम्पी’चा प्रादुर्भाव

Warna Dam : वारणा धरणपाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला

Radhanagari Dam : कोल्हापुरात जोरदार पाऊस,'राधानगरी'चे चार दरवाजे उघडले

SCROLL FOR NEXT