Kharif Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season : खरिपात सव्वा लाख हेक्टरवर तूर, मूग, उडदाची प्रात्यक्षिके

Kharif Crop : खरीप हंगामात उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य कार्यक्रमातून पीक प्रात्यक्षिके घेतली जात आहेत.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : खरीप हंगामात उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य कार्यक्रमातून पीक प्रात्यक्षिके घेतली जात आहेत. यंदा राज्यात तूर, मूग, उडदाची मिळून सुमारे १ लाख १६ हजार हेक्टर सलग प्रात्यक्षिके आहेत.

शिवाय तुरीत सोयाबीनचे आंतरपीक घेण्यासंबंधी १ लाख १० हजार हेक्टरवर प्रात्यक्षिक घेतली जातील. यावर सुमारे २०३ कोटींचा खर्च होणार आहे. राज्यात खरिपात मूग, उडदाचे पीक घेतले जाते. प्रामुख्याने पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस आला तर उडीद, मुगाच्या क्षेत्रात वाढ होते.

यंदा या पिकांचे क्षेत्र वाढण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. याशिवाय पिकांच्या उत्पादनवाढीसंदर्भात शेतकऱ्यांनी प्रयोग करावेत, यासाठी कृषी विभागाकडून दरवर्षी पीक प्रात्यक्षिके घेतली जातात. त्यासाठी शासनाकडून बियाणे, निविष्ठा व अन्य बाबीवर खर्च केला जातो.

मूग, उडदाच्या प्रात्यक्षिकांचे नियोजन करताना हेक्टरी ९ हजारांचा खर्च करण्याचे नियोजन आहे. एका प्रात्यक्षिकांत १० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. प्रामुख्याने अधिक घेतल्या जाणाऱ्या पिकांनुसार प्रात्यक्षिकासाठी शेतकऱ्याची निवडी होत आहे.

यंदा राज्यात मूग, उडदाचे मिळून ६६ हजार हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके घेतली जातील. त्यावर ६० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तेवढा निधीही मंजूर केला आहे. मुगाचे नाशिक, धुळे, जळगाव, नगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी जिल्ह्यांत अधिक प्रमाणात तर उडदासाठी नंदुरबार, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, नांदेड, बुलडाणा, वाशीम, वर्धा, बीड, पालघर जिल्ह्यांत प्रात्यक्षिके आहेत. कोकण आणि विदर्भात मात्र मूग, उडदाची फारशी प्रात्यक्षिके नाहीत.

जिल्हानिहाय मुगाची व कंसात उडदाची प्रात्यक्षिके (एका प्रात्यक्षिकांत दहा हेक्टर क्षेत्र)

नाशिक ः १४० (८०) धुळे ः ९० (३०), नंदुरबार ः ५० (८०), जळगाव ः २४० (३०) नगर ः ३९० (३७०), पुणे ः १९० (२०), सोलापूर ः १४० (४१०), सातारा ः ८० (२०), सांगली ः ६० (१४०), कोल्हापूर ः १०(२०), छत्रपती संभाजीनगर ः १२० (५०), जालना ः २६० (१२०), बीड ः १८० (२६०), लातूर ः १०० (८०), धाराशिव ः १९० (४००), नांदेड ः २३० (२६०), परभणी ः २२० (८०), हिंगोली ः ७० (५०), बुलडाणा ः १७० (२००), अकोला ः १५० (१००), वाशीम ः ७० (९०), अमरावती ः १३० (१००), यवतमाळ ः ७० (७०), वर्धा ः ० (१०), पालघर ः ० (३०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT