Sangli News : सांगली जिल्ह्यात खरीप हंगामाची पेरणी सुरू झाली असून कर्ज वितरणही सुरू झाले आहे. मे अखेर ५४ हजार ३७९ सभासदांना ५५९ कोटी ८९ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप केले आहे. कर्ज वाटपाची टक्केवारी २९ टक्के आहे. जिल्हा बॅंकेने सर्वाधिक कर्जवाटप केले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली.
यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्हा बॅंकेसाठी ९५ हजार ९०३ सभासदांना १०५८ कोटी ८५ लाख, राष्ट्रीय, व्यापारी बॅंकांना ४८ हजार ४२४ सभासदांना ५३४ कोटी ०३ लाख, खासगी बॅंकांसाठी २६ हजार १५८ सभासदांना २९० कोटी ७१ लाख आणि ग्रामीण बॅंकासाठी ५३३ सभासदांना ५ कोटी ८८ लाख असे एकूण १ लाख ७१ हजार १८ सभासदांना १८८९ कोटी ४७ लाख कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे.
जिल्ह्यातील शेतकरी मे महिन्यापासून खरीप हंगामाची तयारी करू लागला आहे. बहुतांश भागातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांच्या कर्जासाठी कागदपत्रांची पुर्तता करून बॅंकाकडे सादर केली आहेत. बँका, सोसायट्या, राष्ट्रीय बँकांतर्फे कर्जाची प्रक्रिया सुरू केली आहे. शेतकऱ्यांना वेळेत कर्जपुरवठा व्हावा, यासाठी बॅंकांनी कर्जही देण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना विनासायास, विनाविलंब पीककर्ज वितरण करण्याचे आदेश सर्व बँकांना दिले आहेत.
जिल्ह्यात मे अखेर ५४ हजार ३७९ सभासदांना ५५९ कोटी ८९ लाखांचे कर्जवितरण केले आहे. जिल्हा बॅंकेने सर्वाधिक पीक कर्जाचे वाटप केले आहे. तर ग्रामीण बॅंकेचे कर्ज वाटपाचे प्रमाण कमी असल्याचे चित्र आहे. जिल्हा बॅंक खरीप हंगामात पीक कर्ज देण्यास नेहमी अग्रेसर असते. मात्र राष्ट्रीय बॅंकेकडून पीक कर्ज देण्यास हात अखडता असतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत पीक कर्ज वाटपास विलंब करू नका, कर्ज देण्यास टाळाटाळ केली तर कडक कारवाई करू, असे आदेश देत असते. परंतु, राष्ट्रीय बॅंकाकडून कर्जपुरवठा करण्यास टाळाटाळ करत असूनदेखील त्यांच्यावर कारवाई होत नाही.
खरीप हंगाम कर्ज वितरण दृष्टिक्षेप
बॅंक सभासद संख्या रक्कम टक्केवारी
जिल्हा बॅंक ४७०२४ ४२२ कोटी २४ लाख ३९.८८
राष्ट्रीय,
व्यापारी बॅंका ५५७८ १०३ कोटी ५७ लाख १९.३९
खासगी बॅंका १६२३ ३ कोटी ४५ लाख १०.८२
ग्रामीण बॅंका १५४ २ कोटी ६३ लाख २९.८९
एकूण ५४३७९ ५५९ कोटी ८९ लाख २९.६३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.