Soybean Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Rate : सोयाबीनला प्रतिक्विंटल ६ हजार ९४५ रुपये दर देण्याची मागणी

Soybean Market : राज्यात खरीप हंगामातील सोयाबीन हे महत्त्वाचे पीक आहे. सुमारे ५० लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली आहे. त्याची सरासरी उत्पादकता हेक्टरी १४.५६ क्विंटल तर सरासरी उत्पादन खर्च प्रतिक्विंटल ६,०३९ आहे.

Team Agrowon

Nashik News : राज्यात खरीप हंगामातील सोयाबीन हे महत्त्वाचे पीक आहे. सुमारे ५० लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली आहे. त्याची सरासरी उत्पादकता हेक्टरी १४.५६ क्विंटल तर सरासरी उत्पादन खर्च प्रतिक्विंटल ६,०३९ आहे.

त्या अनुषंगाने राज्य कृषी मूल्य आयोगाकडे प्रतीक्विंटल ६९४५ दर दिला जावा, अशी शिफारस केली आहे, ती रास्त आणि योग्य आहे. त्यानुसार चालू हंगामात सोयाबीनला प्रतिक्विंटल ६,९४५ रुपये दर देण्यात यावा, अशी मागणी भारतीय किसान संघाकडून करण्यात आली आहे.

बाजारात यावर्षी सोयाबीन खरेदीदारांनी संघटित प्रयत्नातून दरावर नियंत्रण ठेवून दर प्रतिक्विंटल ४५००च्या वर जाऊ दिले नाहीत. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर लाभकारी किंमत मिळत नसेल तर राज्य सरकारने भावांतर पद्धतीने किंवा बोनसच्या माध्यमातून फरक देण्याची व्यवस्था करावी, या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना किसान संघाकडून पाठविण्यात आले आहे.

तसेच निवेदन नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. निवेदन देतेवेळी भारतीय किसान संघाचे उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख सुभाष तिडके, नाशिक जिल्हा कोषाध्यक्ष मनोज जगताप, जिल्हा संघटक सूरज कोकणे, जिल्हा उपाध्यक्ष विमल शेरमाळे, सुनीता आव्हाड, बालाजी गायधनी आदी उपस्थित होते.

नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, कीड-रोग या कारणाने सरासरी उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी हे सण तोंडावर आहेत.

उत्पादन खर्चावर आधारित लाभकारी किंमत व घामाचे दाम अन्नदात्याला मिळून हे सणासुदीचे दिवस सुखाचे जावेत ही अपेक्षा आहे. लाडक्या बहिणीचा विचार केलात तसा लाडक्या शेतकऱ्यांचा पण निश्चित विचार करून वरील निर्णय घ्यावा, अशी मागणी भारतीय किसान संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Farmer Bonus: धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस द्या : मुनगंटीवार

Mumbai APMC File Case: मुंबई राष्ट्रीय बाजार समितीत फाइल पळविल्याचा आरोप

Sugarcane Price: साडेपाच हजारांच्या ऊसदराचे गणित साखरेच्या भावावर अवलंबून

Agricultural Pump Capacitor: अभियंत्यांनी स्वखर्चाने जोडले दहा कपॅसिटर

Maharashtra Farmer Compensation: दुष्काळात पाणी, चारा, रोजगाराला प्राधान्य

SCROLL FOR NEXT