Drought Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Update : मानोरा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी

Sachiv Devanand : यंदा जिल्ह्याची पैसेवारी ४८ पैसे काढली असल्याने शासनाने मानोरा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना लाभ द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांसह काँग्रेस पक्ष आंदोलन करेल असा इशारा महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचे संघटन सचिव देवानंद पवार यांनी दिला.

Team Agrowon

Washim News : यंदा जिल्ह्याची पैसेवारी ४८ पैसे काढली असल्याने शासनाने मानोरा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना लाभ द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांसह काँग्रेस पक्ष आंदोलन करेल असा इशारा महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचे संघटन सचिव देवानंद पवार यांनी दिला. सोमवारी (ता. १ जानेवारी) त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.

ते म्हणाले, ‘‘मानोरा तालुका डोंगराळ व अतिदुर्गम भागात मोडतो. संत सेवालाल महाराज यांचे पदस्पर्शाने पुनीत तालुका असताना मोठ्या प्रमाणात हा तालुका दुर्लक्षित ठेवण्यात राजकीय पुढाऱ्यांचा नाकर्तेपणा आहे. या तालुक्यात रोजगाराच्या सोयीसुविधा नसल्याने मोठ्या प्रमाणात मजुराचे स्थलांतर होत असते.

तालुक्यात एमआयडीसी आहे. मात्र उद्योग उभारल्या गेलेले नाहीत. येथे आरोग्य, शिक्षण सुविधांची वाणवा असून राजकीय लोक धार्मिकतेकडे नेत आहेत. येथील नागरिकांचे दरडोई उत्पन्न सुद्धा कमी आहे.

३१ डिसेंबरला महसूल विभागाकडून मानोरा तालुक्याची अंतिम पैसेवारी ४८ पैसे काढल्याने शासनाने तत्काळ आदेश काढून येथील शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा देण्यात याव्या. मानोरा तालुक्यात जंगली प्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात आहे. पंजाब

सरकारच्या धर्तीवर जंगली डुकर मारण्याची परवानगी द्यावी व जंगली प्राण्यांपासून शेतीपिकाला नुकसान भरपाई देण्यात यावी,’’ अशी मागणीही पवार यांनी केली. या वेळी ईफतेखार पटेल, साहेबराव पवार, गजानन राठोड, महेश जाधव, डॉ. अशोक करसडे, बरखा बेग, रामनाथ राठोड, हाफिज खान आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Digital Crop Survey: डिजिटल क्रॉप सर्व्हेसाठी राज्याला २६ कोटी; SC प्रवर्गासाठी स्वतंत्र निधीची मंजुरी

Sea Link: उत्तन-विरार सागरी सेतू उभारण्यात येणार

Sugar Factory: विलास साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला प्रारंभ

Soybean MSP Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी प्रशासन सज्ज

Agrowon Podcast: सोयाबीनचे दर स्थिर, कापूस आवक सुधारतेय; काकडी व लसणाला वाढीला उठाव, मोसंबीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT