Drought Update : आणखी २२० महसुली मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर

Drought Crisis : राज्यात नव्याने निर्माण झालेल्या, पण जेथे पर्जन्यमापक यंत्रे नाहीत, अशा २२० मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यास मदत व पुनर्वसन विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिली.
Drought
DroughtAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात नव्याने निर्माण झालेल्या, पण जेथे पर्जन्यमापक यंत्रे नाहीत, अशा २२० मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यास मदत व पुनर्वसन विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिली. मंगळवारी (ता. २) झालेल्या बैठकीत ४० तालुके आणि १०२१ मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर द्यावयाच्या सवलतींचाही आढावा घेण्यात आला.

२०१८ मध्ये दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला होता. तसेच २६८ मंडलांमध्येही दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून सवलती देण्यात आल्या होत्या. त्यानंतर ज्या महसूल मंडलांमध्ये अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आलेल्या ९३१ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून ८ सवलती दिल्या होत्या.

Drought
Drought Management : गावस्तरावरच होईल दुष्काळाचे व्यवस्थापन

त्या धर्तीवरच १०२१ मंडले आणि ४० तालुक्यांतील २३९ मंडलांव्यतिरिक्त २२० मंडलांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली. या मंडळांमध्ये पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आलेली नाहीत, तसेच काही ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रेही बंद अवस्थेत आहेत.

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता महसुली विभागांकडे कृषी विभागातून मिळालेल्या माहितीचे संकलन करण्यास लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणे शक्य होणार नाही.

हीच परिस्थिती लक्षात घेऊन मंत्रिमंडळ उपसमितीने उर्वरित मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला. खरीप हंगाम २०२३ मध्ये १०२१ मंडलांपैकी ज्या मंडलांचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडल स्थापन करण्यात आले आहे आणि ज्या महसुली मंडलांत पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेले नाही, अशा नवीन महसुली मंडलांना अविभाजित मंडळांकरिता ही दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे.

Drought
Drought Condition Maharashtra : दुष्काळग्रस्तांना दिलासा पीक कर्जाच्या वसुलीस स्थगिती, राज्य सरकारचे आदेश

तसेच ज्या ४० तालुके आणि १०२१ मंडले वगळता जून ते सप्टेंबर या कालावधीत एकूण पर्जन्यमान ७५० मिलिमीटरपेक्षा कमी असलेल्या आणि उर्वरित ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेल्या महसुली मंडळांत अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आलेल्या गावांमध्येही २०१८ च्या धर्तीवर दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्याचा विचार करण्यात येणार आहे.

याआधी सप्टेंबरमध्ये जाहीर दुष्काळ

जिल्हे तालुके मंडले

१५ ४० २३९

१०-११-२३

२७ १८९ १०२१

नव्याने जाहीर केलेली महसुली मंडले (जिल्हानिहाय)

नागपूर २२

वर्धा ८

चंद्रपूर २३

गडचिरोली १९

धुळे २२

जळगाव ११

अहमदनगर ३४

पुणे १४

सांगली ३

कोल्हापूर ४२

सोलापूर १०

सातारा १२

राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती आहे. पाणीपुरवठा, चारा, ऊर्जा आणि अन्य बाबींवर शासन गंभीरपणे विचार करत आहे. या सर्व बाबींवर मंत्रिमंडळ उपसमितीत चर्चा झाली. सर्व विभाग दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी काम करत आहेत. शेतकऱ्यांना लवकरच दुष्काळी परिस्थितीशी संबंधित सवलतींचा लाभ मिळेल.
- अनिल पाटील, मदत व पुनर्वसनमंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com