Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : इंदापूर तालुक्यात टँकरची मागणी वाढली

Water Crisis : मे महिना चालू असल्याने पाण्याची टंचाई दिवसेंदिवस वाढू लागली आहे. जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील २१ गावांना दररोज ४३ टँकरने ११७ खेपा पाणी पुरविले जात आहे.

Team Agrowon

Pune News : मे महिना चालू असल्याने पाण्याची टंचाई दिवसेंदिवस वाढू लागली आहे. जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील २१ गावांना दररोज ४३ टँकरने ११७ खेपा पाणी पुरविले जात आहे. तर आठ गावांचे टँकर मागणी प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

सध्या सोलापूरला उजनीचे पाणी पिण्यासाठी नदीतून सोडण्यात आल्याने, टंचाईची स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवाय टँकर भरण्यासाठीच्या स्रोतांची पाणी पातळी घटली जाणार असून, पाण्याचे स्रोत मिळविण्याचे नवे आव्हान निर्माण होणार असल्याची शक्यता आहे.

इंदापूर तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केल्यास, तालुक्याच्या एका बाजूला नीरा नदी, दुसऱ्या बाजूल भीमा नदी आहे. दोन्ही नद्यांमध्ये नीरा डावा कालवा व खडकवासला कालवा आहे. मात्र तालुक्यातील ठरावीक पट्टा कायम अवर्षण प्रवण क्षेत्र राहिला आहे.

सध्या या भागातील काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सन २०१८मध्ये टंचाईची स्थिती निर्माण झाल्यानंतर तालुक्यात ६२ टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. यंदाही पावसाचे प्रमाण कमी असल्याने, टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

उजनीलगतच्या गावांतूनही होणार टँकरची मागणी

उजनीलगतच्या गावांतूनही होणार टँकरची मागणी होत आहे. उजनी धरणामध्ये तालुक्यातील २८ गावे बुडित, तर ५ गावे बाधित झालेली आहेत. या गावांचे पुनर्वसन झाल्यानंतर त्यांना उजनीच्या पाण्याचा हक्काचा व कायमचा स्त्रोत आहे.

यंदा मात्र दुष्काळाची टंचाई तीव्र असल्याने धरणग्रस्तांचे हक्काचे पाणी दुरावले आहे. यात नदीतून पाणी सोडल्याने धरणाच्या पाण्याने तळ गाठ गाठला आहे. परिणामी गावागावांच्या पाणीपुरवठा योजनांची पाणीपातळी खालावली आहे. येत्या काही दिवसांत उजनीलगतच्या गावांतूनही टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT