Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : उन्हाळ्याच्या झळा वाढू लागल्याने बुलडाणा जिल्ह्यात टँकरची मागणी

Water Tanker : उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. तशाच स्वरूपात पाणीटंचाईलाही सुरुवात झाली असून, दररोज टँकरची संख्या वाढू लागली आहे.

Team Agrowon

BUldana News : उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. तशाच स्वरूपात पाणीटंचाईलाही सुरुवात झाली असून, दररोज टँकरची संख्या वाढू लागली आहे. सध्या नऊ टँकर जिल्ह्यात धावत असून पुढील दोन महिन्यांच्या काळात ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वर्षात असमतोल पाऊस, कमी प्रमाणात भरलेले प्रकल्प यामुळे पाणीटंचाई वाढत आहे.

सद्यःस्थितीत जिल्ह्यात २७ हजार नागरिकांची तहान टँकरच्या पाण्याने भागते आहेत. ६० गावांत ७३ विहिरींचे अधिग्रहणही मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच झाले. जिल्ह्यात गेल्या महिन्यापर्यंत चार टँकर धावत होते. ती संख्या आता नऊवर पोहोचली. जिल्ह्यातील पाण्याची समस्या पाहता या वर्षी किमान दीडशेपेक्षा अधिक टँकर सुरू करावे लागतील, अशी शक्यता आहे.

जिल्ह्यात असलेल्या छोट्या व मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी २५ टक्के जलसाठा आहे. सर्वमिळून हा जलसाठा ११५ दलघमी एवढा होतो. उन्हाळा संपण्यास अद्याप तीन महिन्यांचा काळ शिल्लक आहे.

अशा स्थितीत प्रकल्पातील पाण्याच्या भरवशावर असलेल्या योजनांनाच हे पाणी लागेल. जिल्ह्यात ६० गावांमध्ये ७३ विहिरींचे अधिग्रहण झालेले आहे.

सर्वाधिक ३९ विहिरींचे अधिग्रहण देऊळगावराजा तालुक्यात झालेले आहे. या वर्षी पाणीटंचाई निवारण्यासाठी प्रशासनाने आधीच ३० कोटी २३ लाख ५५ हजार रुपयांचा कृती आराखडा तयार केलेला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT