Water Crisis : नगर जिल्ह्यात ३२ हजार लोकांची तहान १३ टँकरवर

Water Shortage : नगर जिल्ह्यात या वर्षी कमी पाऊस झाल्याने फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. भूजल पाणीपातळी खोल गेल्याने विहिरींसह कूपनलिका कोरड्याठाक होऊन लागल्याने दिवसेंदिवस पाणीटंचाई झळ आता वाढत आहे.
Water Shortage
Water ShortageAgrowon

Nagar News : नगर जिल्ह्यात या वर्षी कमी पाऊस झाल्याने फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. भूजल पाणीपातळी खोल गेल्याने विहिरींसह कूपनलिका कोरड्याठाक होऊन लागल्याने दिवसेंदिवस पाणीटंचाई झळ आता वाढत आहे.

सध्या जिल्ह्यात १७ गावे ८५ वाड्यांना १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत केला जात आहे. ३१ हजार ८५७ लोकसंख्येची तहान टँकरच्या पाण्याने भागविली जात आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात यंदा टंचाईच्या झळा वाढू लागल्या आहेत.

नगर जिल्हा प्रशासनाने नोव्हेंबर महिन्यातच टंचाई आराखडा तयार केला. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या उपाययोजनेसाठी टँकरची एजन्सी नियुक्ती करण्यासाठी डिसेंबरमध्ये निविदा प्रक्रिया सुरू केली होती.

Water Shortage
Marathwada water shortage : मराठवाड्यात पाण्याची टंचाई; २ जिल्ह्यात पाणीपुरवठ्यासाठी टँकरांच्या फेऱ्या

डिझेलचे वाढलेले भाव, शासनाकडून वेळेवर बिल न मिळणे, गाव पातळीवरील राजकारणांमुळे पाणी पुरवठ्याबाबत सतत तक्रारी होणे अशी विविध कारणांमुळे टँकर चालक पाणी परवठ्याकडे पाठ फिरवित आहेत. नगर जिल्हा प्रशासनाने काढलेल्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. पुन्हा फेरनिविदा काढण्यात आली.

Water Shortage
Water Shortage : खानदेशात टँकर वाढू लागले

या निविदेला प्रतिसाद मिळाल्यानंतर नुकतीच एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे. त्यामार्फत आता पाणी पुरवठा होत आहे. सध्या पाथर्डी व संगमनेर या दोन तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाथर्डी तालुक्यात १२ गावे ६८ वाड्यांना १३ टँकरद्वारे २३ हजार ४९५ लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात आहे.

संगमनेर तालुक्यातील ५ गावे १७ वाड्यांना ४ टँकरद्वारे ८ हजार ३६२ लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणी पुरवठा करण्यसाठी टँकर मंजुरीचे अधिकार पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना होते. नागरिकांना टँकर उपलब्ध होण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांना हे अधिकार दिले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com