Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Survey Demand : पूर्वमोसमी पावसाने झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी

Heavy Rain : धुळे जिल्ह्यातील साक्री, धुळे भागात या महिन्यात गारपीट, बेमोसमी पाऊस झाल्याने पिकांसह घरे, गोठ्यांचे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Dhule News : धुळे जिल्ह्यातील साक्री, धुळे भागात या महिन्यात गारपीट, बेमोसमी पाऊस झाल्याने पिकांसह घरे, गोठ्यांचे नुकसान झाले आहे. याबाबत कृषी व महसुली मंडळीने सरसकट पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

साक्री तालुक्यातील वार्सा, पिंपळनेर, देशशिरवाडे, चिंकसे व अन्य पाड्यांवर बेमोसमी पावसाचा फटका बसला. तसेच धुळ्यातील कापडणे, लामकानी, देवगाव, कुसुंबा व अन्य भागांसही वादळी पावसाने झोडपले. मागील काही दिवसांत वारंवार वादळ व पाऊस झाला. यात घरांसह गोठे, शेतातील चारा, बाजरी, कांदा चाळी आदींची हानी झाली आहे.

परंतु याबाबत महसूल विभाग पंचनामे करीत नसल्याच्या तक्रारी आहेत. तर काही भागात फक्त काही शेतकऱ्यांच्याच नुकसानीची माहिती संकलित करून त्याचे अहवाल तयार केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. या स्थितीत प्रशासनाने संबंधित भागात सरसकट पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कारण पीकहानी सर्वत्र झाली आहे. त्यात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान ५० टक्क्यांवर आहे. गोठ्यांची देखील हानी झाली आहे. पाहणी करून गोठे, घरांची माहिती संकलित करावी. परंतु शेतशिवारातील नुकसानीची माहिती सरसकट घेवून त्यात नुकसानीची माहिती नमूद करावी व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

वादळ व गारपीट मागील काही दिवसांत रोज झाली आहे. यात साक्री तालुक्यात कांदा चाळी, आंबा पिकांसह तेंदूपत्ता व अन्य वनवृक्षांचे नुकसान झाले आहे. याबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी व नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणीदेखील केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Rajan Patil: सहकार परिषद कृतिशील होईल

Indigenous Cattle: ही ‘लक्ष्मी’ जपणार कोण?

Agriculture Pest Infestation: मूग, उडीद पिकांवरील किडींचे व्यवस्थापन

Home Industry: नाचणी, भाजीपाल्याच्या पापडांची चव न्यारी

Rural Development: ग्रामविकास, बचत गटाला चालना देणारी ‘वनश्री’

SCROLL FOR NEXT