Crop Damage Rain
Crop Damage Rainagrowon

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Agriculture Department : कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी याचा पंचनामा केला. सुमारे तासभर चाललेल्या या गारपिटीमुळे घरांचेही नुकसान झाले.

Kolhapur Rain : मागच्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसाने शेकडो हेक्टर जमीनीवरील पिकांचे नुकसान झाले. गारपिटीमुळे करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये केळी, टोमॅटो, मिरची, भेंडी या सुमारे १२ एकर क्षेत्रांतील पिकांचे मिळून सुमारे १५ लाख, तर २५० एकर क्षेत्रातील ऊसशेतीला फटका बसला.

यात शेतकऱ्यांचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले. याचा पंचनामा कृषी विभागाने केला आहे. या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बुधवारी (ता. २२) झालेल्या वादळी पाऊस, गारपिटीमुळे गडमुडशिंगीतील भाजीपाला आणि ऊस शेतीचे नुकसान झाले.

यानंतर कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी याचा पंचनामा केला. सुमारे तासभर चाललेल्या या गारपिटीमुळे घरांचेही नुकसान झाले, परंतु सर्वात जास्त नुकसान झाले ते हातातोंडाला आलेल्या शेतमालाचे. केळी, टोमॅटो, मिरची, भेंडी अशा हाताशी आलेल्या पिकांना फटका बसलाच शिवाय सुमारे अडीचशे एकर क्षेत्रातील ऊसशेतीचेही नुकसान झाले.

उसाची पाने फाटून सुरळीपर्यंत पाने झडली. या पानझडीमुळे उसाचे सुमारे तीस ते पस्तीस टक्के उत्पादन कमी होईल, असा भीती व्यक्त होत आहे. यामुळे अंदाजे दीड कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.

Crop Damage Rain
Crop Damage Compensation : सांगलीतील ७३ हजार शेतकऱ्यांना १९ कोटींचा परतावा

शेतामध्ये टोमॅटोचे पीक घेतले होते. अचानक झालेल्या गारपिटीमुळे सगळ्या पिकाचे नुकसान झाले. तसेच ऊस शेतीलाही म बसला आहे. याची भरपाई मिळावी. - सचिन पाटील, शेतकरी, गडमुडशिंगी

अतिशय कष्टाने देशी केळीची शेती पिकवली होती. केळीचे उत्पादन ही सुरू झाले होते. तसेच वसई केळीचे पीकही लगेचच सुरूणार होते. यामध्ये आंतरपीक म्हणून घेतलेल्या मिरचीचेही नुकसान झाले आहे • प्रमोद चौगुले, शेतकरी, गडमुडशिंगी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com