Soybean Rate Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Rate Issue : सोयाबीन पिकाला ८ हजार ५०० रुपये भाव देण्याची मागणी

Soybean Rate : औसा (जि. लातूर) येथे अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे हे मागील सहा दिवसांपासून सोयाबीनला प्रतिक्विंटल ८५०० रुपये भाव देण्यात यावा, या मागणीसाठी उपोषण करीत आहेत.

Team Agrowon

Soybean Production : बदनापूर, जि. जालना : औसा (जि. लातूर) येथे अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे हे मागील सहा दिवसांपासून सोयाबीनला प्रतिक्विंटल ८५०० रुपये भाव देण्यात यावा, या मागणीसाठी उपोषण करीत आहेत.

त्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शविण्यासाठी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्यावतीने सोमवारी (ता. २३) बदनापूरच्या तहसीलदार अश्विनी डमरे यांच्या दालनात जाऊन त्यांच्या टेबलवर सोयाबीन पीक ठेवले. तसेच त्यांना निवेदन सादर करून हा प्रश्न दोन दिवसांत निकाली निघाला नाही तर आम्ही तहसील आणि तालुका कृषी कार्यालय ताब्यात घेऊ, असा इशारा दिला.

यावेळी छावा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष देवकरन वाघ, जिल्हाध्यक्ष संदीप ताडगे, मराठवाडा कार्याध्यक्ष विलास कोल्हे, युवक जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र घोगरे, किरण चौधरी, ज्योतिराम माने, नानासाहेब जोगदंड, सुरेश जाधव, लक्ष्मण साबळे, कैलास कोल्हे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी हातात सोयाबीनचे झाड घेऊन सोयाबिनला ८ हजार ५०० रुपये भाव मिळाला पाहिजे, उपोषणकर्त्या विजयकुमार घाडगे यांची प्रकृती बिघडत असून त्यांच्या जिवित्वाला धोका निर्माण झाल्याने शासनाने त्यांच्या मागण्या तातडीने मंजूर कराव्यात, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशा मागण्यां करत तहसीलदार अश्विनी डमरे यांचे कार्यालय गाठले. तिथे त्यांच्या टेबलवर सोयाबीन पिकाचे झाड टाकून त्यांना निवेदन सादर केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT