Fruit Crop Insurance Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : फळ पीकविमा परतावे त्वरित मिळण्याची मागणी

Crop Insurance Update : हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत २०२२-२३ मध्ये सहभागी झालेल्या केळी विमाधारकांचे अन्यायकारकपणे रद्द केलेले विमा प्रस्ताव पुन्हा मंजूर करावेत.

Team Agrowon

Jalgaon News : हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत २०२२-२३ मध्ये सहभागी झालेल्या केळी विमाधारकांचे अन्यायकारकपणे रद्द केलेले विमा प्रस्ताव पुन्हा मंजूर करावेत, वादळात नुकसानीसंबंधीचे परतावे लवकर दिले जावेत, आदी मागण्या शेतकरी व राज्य शेतकरी संघटनेने केल्या.

याबाबत जळगाव शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर केळी विमाधारकांनी मोर्चा काढला होता. मोर्चात जिल्ह्यातील शेकडो विमाधारक शेतकरी सहभागी झाले होते. परंतु याची दखल घेण्यात आली नाही. पुन्हा एकदा आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. सहा हजार ६८२ शेतकरी विमा परताव्यापासून वंचित आहेत. हक्काचा विमा परतावा मिळालाच पाहीजे, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा संघटनेचे संदीप पाटील, किरण गुर्जर, सचिन शिंपी आदींनी दिला आहे.

...या आहेत मागण्या

फळ पीकविमा योजनेत २-२२-२३ मध्ये सहभागी झालेल्या १० हजार ६०० केळी विमाधारक शेतकऱ्यांचे प्रस्ताव अन्यायकारकपणे नामंजूर केले होते. यातील सहा हजार ६८२ शेतकऱ्यांचे प्रस्ताव फेरतपासणीत मंजूर झाले. परंतु या विमाधारकांना परतावे देण्यास शासन नकार देत आहे.

यातील तक्रारदार शेतकऱ्यांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही केली जावी व त्यांना परतावे मिळावेत,ज्या केळी विमाधारकांचे प्रस्ताव शेतात केळी असतानाही नामंजूर केले आहेत, त्यासंबंधी फेरचौकशी सुरू करून सर्वांना लाभ दिला जावा, मागील सहा महिने केळी विमाधारक शेतकरी विविध प्रश्नांवर मागण्या करीत आहेत, त्यासंबंधी शासन, विमा कंपनी दखल घेत नसल्याने अडचणी आहेत. प्रशासनाने प्रश्न मार्गी लावावा, अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT