Flower Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Flower Rate : गणेशोत्सवामुळे फुलांना वाढणार मागणी

Flower Market : आळेफाटा परिसरात झेंडू, अॅस्टर, मोगरा, शेवंती, गुलाब फुलांची मोठ्या प्रमाणात लागवडी झालेल्या आहेत. विशेष करून झेंडूची लागवड या वर्षी मोठ्या प्रमाणात झालेली आहे.

Team Agrowon

Alephata News : आळेफाटा परिसरात झेंडू, अॅस्टर, मोगरा, शेवंती, गुलाब फुलांची मोठ्या प्रमाणात लागवडी झालेल्या आहेत. विशेष करून झेंडूची लागवड या वर्षी मोठ्या प्रमाणात झालेली आहे.

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवामुळे येथील फुलांची मागणी वाढणार आहे. त्या अनुशंगाने बाजारभावतही वाढ होईल, अशी अपेक्षा फूल उत्पादकांनी व्यक्त केली आहे.

झेंडूचे पीक घेताना एका एकरसाठी सुमारे सत्तर ते ऐशी हजार रुपये खर्च येतो. श्रावण महिन्यात फुलांचे बाजारभाव उतरलेले होते. परंतु गणेशोत्सव जवळ आल्याने फुलांना चांगली मागणी होऊ वाढली आहे, अशी माहिती एका शेतकऱ्याने दिली.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेतातील फुलांचे मळ्यात फुले चांगली आलेली असून, सध्या या फुलांची तोडणी सुरू आहे.

गणपती उत्सवात फुलांना चांगला बाजारभाव मिळत आहे. प्रतिकिलोला पन्नास रुपये मिळत असून, पुढील दोन दिवसांत अजून बाजारभाव वाढतील, अशी माहिती फूलविक्रेता अक्षय घोलप यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT