Wild Flower : श्रावणात रानफुलांनी बहरले डोंगर

Floriculture : विकासाची नवनवीन क्षितिजे गाठणारा उरण तालुका पावसाळ्यात अतिशय लोभस दिसतो. येथील डोंगर कपारीतील रानमाळ सुंदर अशा विविध फुलांनी बहरतो.
Wild Flower
Wild FlowerAgrowon
Published on
Updated on

Uran News : विकासाची नवनवीन क्षितिजे गाठणारा उरण तालुका पावसाळ्यात अतिशय लोभस दिसतो. येथील डोंगर कपारीतील रानमाळ सुंदर अशा विविध फुलांनी बहरतो. त्‍यामुळे गेल्‍या काही दिवसांपासून पर्यटकांचे पाय उरणकडे वळू लागले आहेत.

पावसाळ्याच्या दिवसात उरण परिसरातील द्रोणागिरी, कळंबुसरे, इंद्रायणी, चिरनेर, अक्कादेवी, पाले, सारडे घोल, पुनाडे डोंगर परिसरातील रानफुलांना चांगलाच बहर येतो. माळरानावर रंगीत गवत फुलांचा सडा पसरतो.

यंदाही संततधार पडणारा पाऊस, निर्सगरम्य वातावरणातील गारवा त्‍यातच रंगीत फुलांची माळ पर्यटकांना आकर्षित करत आहे. तालुक्यातील माळराने विविध फुलांनी बहरली आहेत. उरण परिसरातील शहरीकरण पाहता, हिरवेगार निसर्गरम्य वातावरण दुरापास्त झाले असे वाटत असतानाच ग्रामीण भागात दिसणारे रम्य वातावरण सर्वांचे मन मोहून घेत आहे.

Wild Flower
Wild Vegetables : रानभाज्यांना चांगला उठाव

निसर्गाची हिरवी शाल पाहून मन आनंदीत होत आहे. निसर्गाचा अनोख्या पातळीवरचा अलौकिक ठेवा असलेल्या हिरवाईवर चवर, दीपकाडी, सोनकी, गेंद, नीलिमा, कापरू, तेरडा आदी प्रकारच्या रानफुलांचे दर्शन घडू लागले आहे.

Wild Flower
Wild Vegetables : रानभाज्या हा निसर्गातील अनमोल मोठा ठेवा : डॉ. इंगळे

परिसरातील माळराने फुलांनी बहरून गालिचा पसरल्यासारखे भासू लागले आहे. पावसाळ्यापूर्वी उन्हाच्या झळा सोसून रखरखीत भासणारा प्रदेश हिरवाईने नटला आहे. या परिसराचा ताबा तेरड्या जांभळ्या फुलांनी घेतला असून पर्यटकांना आकर्षित करू लागला आहे.

गेल्‍या काही महिन्यापासून परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटन वाढले आहे. सातारा येथील कास पठाराच्‍या धर्तीवर या क्षेत्राचा विकास करावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे. शिवाय सदर परिसराचा विकास झाला तर येथील खेड्यापाड्यातील गोरगरीब नागरिकांसाठी आर्थिक दरवाजे खुल्ले होतील, अशी आशा व्‍यक्‍त करण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com