Cotton Seed Agrowon
ॲग्रो विशेष

BT Cotton Seeds : धुळे जिल्ह्यात बीटी कापुस बियाणांच्या अकरा लाख पाकिटांची मागणी

Cotton Seeds Demand : धुळे जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात कापसाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जिल्ह्यासाठी बीटी कापूस बियाणाच्या दहा लाख ९९ हजार ४०० पाकिटांची मागणी केली आहे.

Team Agrowon

Dhule News : धुळे जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात कापसाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जिल्ह्यासाठी बीटी कापूस बियाणाच्या दहा लाख ९९ हजार ४०० पाकिटांची मागणी केली आहे. त्यापैकी चार लाख २३ हजार १०० बीटी कापूस बियाणांची पाकिटे उपलब्ध झाली आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी १ जूननंतर पुरेसा पाऊस पडल्यानंतरच कापसाची लागवड करावी, असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी कावेरी राजपूत यांनी केले आहे.

खरीप हंगामाकरिता जिल्ह्यासाठी एकूण २७ हजार २४५ क्विंटल बियाणे मागणी करण्यात आली आहे. यात आतापर्यंत विविध पिकांचे १२ हजार ६२० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. तसेच, बीटी कापूस पिकांचे दहा लाख ९९ हजार ४०० बियाणे पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी चार लाख २३ हजार १०० पाकिटे उपलब्ध झाली. उर्वरित बियाणे पुरवठा करण्याच्या सूचना संबंधित बियाणे कंपनी प्रतिनिधींना देण्यात आल्या आहेत.

बियाण्यांबाबत खात्री करा

दरम्यान, शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे. बनावट, भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी पावती घ्यावी. पावतीवर बियाण्याचा संपूर्ण तपशील (पीक, वाण, संपूर्ण लॉट नंबर, बियाणे कंपनीचे नाव, किंमत, खरेदीदाराचे नाव व पत्ता विक्रेत्याचे नाव) असावा.

खरेदी केलेल्या बियाण्यांचे वेष्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पाबती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. खरेदी केलेले बियाणे त्या हंगामासाठी शिफारस केल्याची खात्री करावी. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाण्याचे पाकीट सीलबंद असल्याची खात्री करावी, बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरची अंतिम मुदत पाहून घ्यावी, कमी वजनाच्या निविष्ठा तसेच, छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री अथवा अन्य तक्रारीसाठी जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्रीमती राजपूत यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT